ETV Bharat / city

Mumbai Corona Update : मुंबईकरांना दिलासा.. कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी १५ हजार दिवसांवर

author img

By

Published : Mar 18, 2022, 5:12 PM IST

मुंबईकरांना दिलासा देणारी माहिती आज समोर आली आहे. मुंबईत कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १५ हजार दिवसांवर पोहोचला ( Corona Patients Doubling Rate Mumbai ) आहे. दोन महिन्यात रुग्ण दुपटीचा कालावधी पाच पटींनी वाढला ( Mumbai Corona Update ) आहे.

मुंबई - मुंबईमध्ये गेले दोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. या कालावधीत विष्णूच्या तीन लाटा येऊन गेल्या. तिसरी लाट ( Covid Third Wave Mumbai ) आटोक्यात आली असून गेल्या दोन वर्षातील सर्वात कमी रुग्णसंख्या सध्या नोंद होत आहे. यामुळे रुग्णदुपटीच्या कालावधीत झपाट्याने वाढ होत आहे. सध्या रुग्ण दुपटीचा कालावधी १५ हजार दिवसांवर गेला ( Corona Patients Doubling Rate Mumbai ) आहे. दुसऱ्या लाटेच्या तुलनेत मागील दोन महिन्यात रुग्ण दुपटीचा कालावधी पाच पटीने वाढला ( Mumbai Corona Update ) आहे. महापालिका आणि मुंबईकरांसाठी ही दिलासादायक बाब आहे.

रुग्ण दुपटीचा कालावधी वाढला

मुंबईमध्ये मार्च २०२० मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या तीन लाटा आल्या असून, त्या थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. तिसऱ्या लाटे आधी १ डिसेंबरला मुंबईमध्ये रुग्ण दुपटीचा कालावधी सर्वाधिक २७८० दिवस इतका नोंदवला होता. जानेवारीच्या ६ ते ८ तारखेला दिवसाला २० हजार रुग्णांची नोंद झाली. यामुळे रुग्ण दुपटीचा कालावधी घसरून ११ जानेवारीला ३६ दिवसांवर आला होता. कोरोना विषाणूचा प्रसार सध्या आटोक्यात असल्याने दिवसाला १०० हुन कमी रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे १७ मार्चला रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून १५,९३३ दिवस इतका नोंदवण्यात आला आहे. दुसऱ्या लाटेत सर्वाधिक २७८० दिवस इतका रुग्ण दुपटीचा कालावधी नोंदवला गेला होता. त्यात पाच पटीने वाढ झालेली दिसत आहे. यामुळे कोरोनाचा प्रसार आटोक्यात असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

बोरिवली येथे रुग्ण दुपटीचा कालावधी ६८८१३ दिवस

मुंबईमध्ये सध्या सर्वाधिक रुग्ण दुपटीचा कालावधी आर सेंट्रल बोरिवली येथे ६८,८१३ दिवस, आर नॉर्थ दहिसर येथे ४९७७८ दिवस, मुलंड टी विभाग येथे ४४४४६, पी नॉर्थ मालाड येथे ४२४६१ दिवस, पी साऊथ गोरेगाव येथे ३०५३४ दिवस, सँडहर्स्ट रोड बी वॉर्ड येथे २५१२१, जी नॉर्थ दादर येथे २३८३२, आर साऊथ कांदिवली येथे २३७८६, जी साऊथ एल्फिस्टन येथे २३०५०, एन विभाग घाटकोपर येथे २१७३० दिवस, सी विभाग मारिन लाईन्स येथे २१४१४ दिवस, के वेस्ट अंधेरी पश्चिम येथे २००९४, एफ साऊथ परेल येथे १९९२५ दिवस इतका नोंदवला गेला आहे.

कुलाब्यात सर्वात कमी रुग्ण दुपटीचा कालावधी

तर सर्वात कमी रुग्ण दुपटीचा कालावधी कुलाबा ए विभाग येथे ४८६८, बांद्रा एच वेस्ट येथे ९४९६, कुर्ला एल वॉर्ड येथे १०५९७, खार एच ईस्ट येथे १०६९९, एम ईस्ट चेंबूर पूर्व येथे ११९१३, भायखळा ई विभाग येथे १३९०९, अंधेरी पूर्व के ईस्ट येथे १४६७३, ग्रांट रोड डी विभाग येथे १५२२०, एम वेस्ट चेंबूर पश्चिम येथे १५८०३, एस विभाग भांडुप येथे १६८४९ दिवस दुपटीचा कालावधी नोंद झाला आहे.

दुसऱ्या लाटेत दुपटीचा कालावधी २७८० दिवस

मुंबईत फेब्रुवारी २०२१ मध्ये कोरोना विषाणूची दुसरी लाट आली. १ फेब्रुवारी रोजी रुग्ण दुपटीचा कालावधी ५६४ दिवस इतका होता. दुसऱ्या लाटेदरम्यान एप्रिल महिन्यात दिवसाला १० ते ११ हजार रुग्ण आढळून आले. रुग्णसंख्या वाढू लागल्याने १ एप्रिलला रुग्ण दुपटीचा कालावधी ४९ तर १८ एप्रिलला हा कालावधी ४५ दिवसांवर घसरून खाली आला. दुसरीला लाट आटोक्यात आल्यावर रुग्णसंख्या घटू लागल्यावर १ डिसेंबर २०२१ ला रुग्ण दुपटीचा कालावधी २७८० दिवस नोंदवला गेला होता.

कोरोना आटोक्यात

रुग्णसंख्या कमी झाल्यावर रुग्ण दुपटीचा कालावधी वाढतो. रुग्णसंख्या वाढल्यावर रुग्ण दुपटीचा कालावधी कमी होतो. डिसेंबर मध्ये कोरोनाची तिसरी लाट आली. मुंबईकरांनी दिलेली साथ आणि नियमांचे केलेले पालन तसेच हर्ड ह्युमीनीटी तयार झाल्याने महिनाभरातच तिसरी लाट आटोक्यात आली. सध्या दिवसाला १०० हुन कमी रुग्ण आढळून येत आहे. यामुळे रुग्ण दुपटीचा कालावधी वाढत आहे. हे पालिकेच्या केलेल्या प्रयत्नाना आलेले यश आहे अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.