ETV Bharat / city

Task Force Meeting : कोरोनाबाबत राज्य सरकार अलर्टमोडवर; मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची टास्कफोर्सची बैठक

author img

By

Published : Jun 6, 2022, 7:06 PM IST

Chief Minister Uddav Thackeray
मुख्यमंत्री ठाकरे यांनी बोलावली तातडीची टास्कफोर्सची बैठक

राज्यात जवळपास दीड हजारांच्या आसपास नवीन रुग्ण संख्या आहे. रुग्ण संख्या वाढू लागल्याने राज्य सरकार अलर्ट मोडवर आला आहे. सरकारने त्रिसूत्री नियमांचे पालन करण्याच्या सूचना वारंवार केल्या जातात. आज मंत्रिमंडळ बैठकीत मास्क सक्तीच्या संदर्भात चर्चा एकमत झाल्याचे समजते. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddav Thackeray) यांनी समितीच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली ( emergency meeting of task force ) आहे.

मुंबई - राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची रुग्ण संख्या पून्हा झपाट्याने वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्‍वभूमीवर आज ८ वाजता मुख्यमंत्र्यांनी ( Chief Minister Uddav Thackeray ) टास्क फोर्स समितीची बैठक ( emergency meeting of task force ) बोलावली. कोरोनाच्या स्थितीचा या बैठकीत आढावा घेतला जाणार आहे.

राज्यात जवळपास दीड हजारांच्या आसपास नवीन रुग्ण संख्या आहे. रुग्ण संख्या वाढू लागल्याने राज्य सरकार अलर्ट मोडवर आला आहे. सरकारने त्रिसूत्री नियमांचे पालन करण्याच्या सूचना वारंवार केल्या जातात. आज मंत्रिमंडळ बैठकीत मास्क सक्तीच्या संदर्भात चर्चा एकमत झाल्याचे समजते. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समितीच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. राज्य आरोग्य विभागाचे अधिकारी, मुख्य सचिव मुंबई महापालिकेसह इतर पालिका, जिल्हा पातळीवरील अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे कोरोनाबाबत पुन्हा निर्बंध लावणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोरोना रुग्णांची संख्या वाढली - गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोरोना रुग्णांची संख्या राज्यामध्ये वाढताना दिसत आहे. खासकरून मुंबई, पुणे, रायगड, ठाणे, नवी मुंबई या शहरी भागांमध्ये सातत्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सध्या मास्कसक्ती नसली तरी, प्रत्येकाने गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावा असे आवाहन खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. इतर मंत्र्यांकडूनही सातत्याने याबाबत आवाहन केले जात आहे. मात्र गेल्या आठ दिवसांपासून सातत्याने होणारी शहरी भागातील रुग्णवाढ पाहता आज होणाऱ्या बैठकीत मास्कसक्ती पुन्हा एकदा केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शाळा सुरू होण्याबाबतही होणार चर्चा - राज्यामध्ये 15 जूनपासून शाळा सुरू होणार आहे. मात्र राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढल्यामुळे शाळा सुरू करण्याबाबत देखील चर्चा बैठकीत होऊ शकते. गेल्या दोन वर्षापासून ऑनलाईन पद्धतीने शाळा सुरू होत्या. यावर्षी नियमित शाळा सुरू करण्याबाबत निर्णय झाला आहे. मात्र पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता शाळेबाबत काही महत्त्वाचे निर्णय आजच्या बैठकीत घेतले जाऊ शकतात.

हेही वाचा - रेल्वे प्रवाशांसाठी खुषखबर...! आयआरसीटीसीने वाढवली ऑनलाइन तिकिट काढण्याची मर्यादा, आता काढता येणार 'इतके' तिकिटे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.