शेअर बाजारात चांगलीच तेजी; सेंसेक्स 500 अंकानं उसळला, निफ्टी 21 हजार 110 अंकावर

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 14, 2023, 12:42 PM IST

Share Market Update

Share Market Update : भारतीय शेअर बाजारानं आज मोठी उसळी घेतल्याचं दिसून आलं. यूएस फेडरल रिझर्व्हच्या धोरणाचा जागतिक बाजारावर सकारात्मक परिणाम झाल्याचं दिसून आलं.

मुंबई Share Market Update : यूएस फेडरल रिझर्व्हच्या धोरणाचा जागतिक बाजारावर चांगलाच परिणाम झाला आहे. त्यामुळे गुरुवारी भारतीय शेअर बाजारात चांगलीच वाढ झाल्याचं दिसून आलं. निफ्टी 50 अंकाच्या मजबूत वाढीसह बाजाराला आज सुरुवात झाली आहे. बीएसईवर सेन्सेक्स 561 अंकांच्या उसळीसह 70 हजार 146 वर उघडला. त्याचवेळी एनएसईवर निफ्टी 0.88 टक्क्यांच्या वाढीसह 21 हजार 110 वर उघडला. आज बाजारात बँक निफ्टी 1 टक्क्यांनी वाढल्याचं दिसून आलं आहे.

यूएस फेडरल रिझर्व्हनं केला नाही कोणताही बदल : मागील वर्षी महागाई कमी झाल्याचा दाखला देत यूएस फेडरल रिझर्व्हनं बुधवारी प्रमुख व्याजदरात कोणताही बदल केला नाही. चेअरमन जेरोम पॉवेल यांच्या नेतृत्वाखाली फेडरल ओपन मार्केट कमिटी (FOMC) आता पुढील वर्षी तीन दर कपातीची अपेक्षा करत व्यक्त करत आहे. त्यामुळे यूएस फेडरल रिझर्व्हनं व्याजदरात बदल न केल्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारातही दिसून आला. भारतीय शेअर बाजारात मोठी उसळी दिसून आली आहे.

काय होती बुधवारी शेअर बाजाराची स्थिती : शेअर बाजार बुधवारी 82 अंकाच्या उसळीसह 69 हजार 633 अंकावर बंद झाला होता. तर निफ्टी 0.19 टक्क्यांच्या वाढीसह 20 हजार 945 अंकावर बंद झाला. एनटीपीसी, हिरो मोटर, पॉवर ग्रीड, आयशर मोटर्स आदी कंपन्यांचे शेअर चांगलेच वधारले होते. दुसरीकडं टीसीएस, इन्फोसिस, अ‍ॅक्सिस बँक, बजाज फिनसर्व आदी कंपन्यांचे शेअर मोठ्या प्रमाणात घसरल्याचं दिसून आलं. आज मात्र शेअर बाजारात चांगलीच वाढ झाल्याचं दिसून आलं.

हेही वाचा :

  1. BSE Sensex Today: मुंबई शेअर बाजारासह निफ्टीनं गाठला विक्रमी निर्देशांक, शेअर बाजारात तेजीची लाट
  2. शेअर बाजारावर भाजपाच्या विजयाचा इफेक्ट; सेन्सेक्स प्रथमच 68,000 पार, गुंतवणूकदारांनी 15 मिनिटांत कमावले 4 लाख कोटी
  3. शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी ग्रीन झोनमध्ये; सेन्सेक्स 69 हजाराच्या पार, तर निफ्टी 20 हजार 800 वर
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.