ETV Bharat / business

सोने प्रति तोळा ३३७ रुपयांनी महाग

author img

By

Published : Feb 23, 2021, 4:57 PM IST

Gold rate news
सोने दर न्यूज

सोन्यापाठोपाठ चांदीचेही दर वधारले आहेत. चांदीचे दर प्रति किलो १,१४९ रुपयांनी वधारून ६९,६६७ रुपये आहेत. मागील सत्रात चांदीचे दर प्रति किलो ६८,५१८ रुपये आहेत.

नवी दिल्ली - सोन्याचे दर प्रति तोळा (१० ग्रॅम) ३३७ रुपयांनी वाढून ४६,३७२ रुपये आहेत. जागतिक बाजारातील स्थितीने सोन्याचे दर वाढल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे.

सोन्यापाठोपाठ चांदीचेही दर वधारले आहेत. चांदीचे दर प्रति किलो १,१४९ रुपयांनी वधारून ६९,६६७ रुपये आहेत. मागील सत्रात चांदीचे दर प्रति किलो ६८,५१८ रुपये होते. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपान पटेल म्हणाले की, दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा ३३७ रुपयांनी वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर स्थिर राहून प्रति औंस १८०८ डॉलर आहे. तर चांदीचा दर प्रति औंस २८.०८ डॉलर आहे.

हेही वाचा-'५ जी'चे वेध; एअरटेलची क्वाकोम्नबरोबर संयुक्त भागीदारी

दरम्यान, देशभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने गुंतवणुकदारांची चिंता वाढली आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढल्याने अर्थव्यवस्थेला फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. अशामध्येच गुंतवणुकदारांनी सर्वाधिक सुरक्षित मानल्या जाणाऱ्या सोन्यामध्ये गुंतवणुकीला पसंती देण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा-दोन दिवसांच्या 'ब्रेक'नंतर पेट्रोल-डिझेलमध्ये पुन्हा दरवाढ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.