ETV Bharat / business

मारुती सुझुकीकडून वाहनांच्या किमतीत वर्षभरातच तिसऱ्यांदा होणार दरवाढ

author img

By

Published : Jun 21, 2021, 3:29 PM IST

गेल्या काही वर्षांपासून वाहनांच्या कच्च्या मालाच्या किमती सातत्याने वाढल्या आहेत. त्यामुळे दरवाढ करणे क्रमप्राप्त ठरल्याचे मारुती सुझुकीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

Maruti Suzuki
मारुती सुझुकी

नवी दिल्ली - देशातील सर्वात मोठी कार उत्पादक मारुती सुझुकी इंडियाने वाहनांच्या किमती दुसऱ्या तिमाहीत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. चालू वर्षातील मारुती सुझुकी इंडियाची ही तिसरी दरवाढ असणार आहे. कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने कंपनीने दरवाढीचा निर्णय घेतला आहे.

गेल्या काही वर्षांपासून वाहनांच्या कच्च्या मालाच्या किमती सातत्याने वाढल्या आहेत. त्यामुळे दरवाढ करणे क्रमप्राप्त ठरल्याचे मारुती सुझुकीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे. मात्र, ही दरवाढ किती असणार आहे, ही माहिती कंपनीने दिलेली नाही. वाहनांच्या किमती दुसऱ्या तिमाहीत जुलै ते सप्टेंबरमध्ये होणार आहे. वाहनांच्या किमती विविध मॉडेलनुसार वाढणार आहेत.

हेही वाचा-जीएसटी कपातीचा फायदा; मारुतीची इको रुग्णवाहिका ८८ हजार रुपयांनी स्वस्त

मारुती सुझुकीने १६ एप्रिलमध्ये वाहनांच्या किमती (दिल्ली एक्सशोरुम) सर्व मॉडेलवर 1.6 टक्क्यांनी वाढविल्या आहेत. तर 18 जानेवारीला कंपनीने निवडक मॉडेलवर 34 हजार रुपयांपर्यंत किमती वाढविल्या आहेत. मारुती सुझुकीकडून अल्टो ते एस-क्रोस अशा 2.99 लाख ते 12.39 लाखापर्यंतच्या (एक्स-शोरुम किंमत) वाहनांची विक्री करण्यात येते.

हेही वाचा-देशात प्रथमच! सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेल्या विमानाचे आंतरराष्ट्रीय उड्डाण

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने वाहनांच्या विक्रीवर परिणाम-

कोरोनाच्या दुसऱ्या लाटने देशभरातील प्रवासी वाहनांच्या विक्रीवर परिणाम झाला आहे. एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात प्रवासी वाहनांची विक्री 66 टक्क्यांनी कमी होऊन 88,045 वाहनांची विक्री झाली आहे. ही माहिती वाहन उद्योगांची संघटना एसआयएएमने दिली आहे. एप्रिल महिन्यात एकूण 2,61,633 वाहनांची विक्री झाली होती. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्युचर्रसच्या (एसआयएएम) आकडेवारीनुसार एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात दुचाकी वाहनांच्या विक्रीत 65 टक्क्यांनी घसरून होऊन 3,52,717 दुचाकींची विक्री झाली आहे. यापूर्वी एप्रिलमध्ये 9,95,097 दुचाकींची विक्री झाली होती. एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात मोटरसायकलच्या विक्रीत 56 टक्के घसरण झाली आहे. एप्रिलमध्ये 6,67,84 मोटरसायकलची विक्री झाली आहे. तर मे महिन्यात 2,95,257 मोटरसायकलची विक्री झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.