ETV Bharat / bharat

Layoffs Reason : अनेक मोठ्या कंपन्या करत आहेत नौकर कपात; 'हे' आहे कारण

author img

By

Published : Jan 29, 2023, 5:22 PM IST

Layoffs News
मोठ्या कंपण्या करीत आहेत नौकर कपात

जगभरातील अनेक कंपन्यामध्ये नोकर कपात सुरु आहे. मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरमधून देखील नोकर कपात करणे, सतत सुरु आहे. यामध्ये अनेक टेक कंपन्या आपल्या क्रमाने नोकरी करणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवत आहे. जाणून घेऊया मोठ्या प्रमाणात नोकर कपात करण्यामागे या कंपनींच्या सीईओंचे काय म्हणणे आहे ते, एका अहवाला द्वारे.

नवी दिल्ली : मोठ्या टेक कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या नोकर कपातीची प्रक्रिया सुरू आहे. उच्च नियुक्ती, अनिश्चित जागतिक आर्थिक परिस्थिती, कोविड-19 साथीच्या रोगामुळे निर्माण होणारी असुरक्षितता हे यामागील कारणे असल्याचे सांगितले जाते आहे. तर नोकर कपात करण्याबाबत 'या' टॉप टेक कंपन्यांचे काय म्हणणे आहे ते जाणून घेऊया.


मेटा (11,000 नोकर कपात करणार) : मेटाचे संस्थापक आणि सीईओ मार्क झुकेरबर्ग म्हणाले, कोविडच्या सुरूवातीस, जग अधिकाधिक ऑनलाइनकडे वळले आणि ई-कॉमर्सच्या तेजीमुळे महसूल वाढला. तसेच ऑनलाइनची मागणी ही महामारी संपल्यानंतरही सुरू राहील आणि ही शाश्वत वाढ होईल, असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला होता, म्हणून मी माझ्या गुंतवणुकीत लक्षणीय वाढ करण्याचा निर्णय घेतला. दुर्दैवाने, ते माझ्या अपेक्षेप्रमाणे झाले नाही. आम्ही केवळ ऑनलाइन कॉमर्सच्या पूर्वीच्या ट्रेंडवर परत आलो नाही, तर आर्थिक मंदी, वाढलेली स्पर्धा आणि जाहिरातींचे नुकसान झाले, यामुळे आमची इनकम कमी झाले. यामध्ये माझी चूक होती आणि मी त्याची जबाबदारी घेतो.


गूगल (12,000 नोकर कपात करणार) : Alphabet आणि Google चे CEO सुंदर पिचाई यांच्या मते, गेल्या दोन वर्षांत आम्ही डीजीटल क्षेत्रात लक्षणीय वाढ पाहिली आहे. त्या लक्षणीय वाढीस लागणारा पैसा गुंतवतांना प्रचंड गोष्टी कराव्या लागल्या. आमच्या ध्येयाची ताकद, आमची उत्पादने आणि सेवांचे मूल्य आणि AI मधील आमच्या सुरुवातीच्या गुंतवणुकीमुळे मिळालेल्या प्रचंड संधीबद्दल मला खात्री आहे. आणि हे पूर्णपणे साध्य करण्यासाठी, आपल्याला योग्य निवडी कराव्या लागतील.


मायक्रोसॉफ्ट (10,000 नोकर कपात करणार) : मायक्रोसॉफ्टचे प्रमुख आणि सीईओ सत्या नडेला म्हणाले की, आम्ही पाहिले की महामारीच्या काळात ग्राहकांनी डिजिटल खर्चावर जोर दिला. आता आम्ही आमचा डिजिटल खर्च कमी करण्याचा विचार करत आहोत. आपण हे देखील पाहत आहोत की, प्रत्येक उद्योग आणि संस्था सावधगिरी बाळगत आहेत, कारण जगातील काही भाग मंदीच्या गर्तेत आहेत आणि इतर भाग मंदीचा अंदाज घेत आहेत.

ऍमेझॉन (18,000 नोकर कपात करणार) : आम्ही एका असामान्य आणि अनिश्चित मॅक्रो इकॉनॉमिक वातावरणाचा सामना करत आहोत, असे Amazon चे CEO अँडी जॅसी म्हणतात. हे लक्षात घेऊन, आम्ही आमच्या ग्राहकांसाठी आणि व्यवसायासाठी सर्वात महत्त्वाचे काय आहे ? याचे पुनरावलोकन करण्यासाठी गेले काही महिने घालवले आहेत. पुनरावलोकनांनंतर, आम्ही अलीकडेच काही संघ आणि कार्यक्रम एकत्रित करण्याचा निर्णय घेतला. अनिश्चित अर्थव्यवस्थेमुळे या वर्षाचे पुनरावलोकन करणे अधिक कठीण झाले आहेत आणि आम्ही गेल्या अनेक वर्षांत प्रचंड गतीने नोकरी दिल्या आहेत.


सेल्सफोर्स (7,000 नोकर कपात करणार) : सेल्सफोर्सचे सीईओ मार्क बेनिऑफ म्हणाले, साथीच्या रोगामुळे आमचा महसूल वाढल्याने आम्ही या आर्थिक मंदीचा सामना करण्यासाठी अनेक लोकांना कामावर घेतले आणि मी त्याची जबाबदारी घेतो. वातावरण अजूनही आव्हानात्मक आहे. आणि आमचे ग्राहक त्यांच्या खरेदीच्या निर्णयासाठी अधिक संयमित दृष्टिकोन स्वीकारत आहेत.


आईबीएम (3,900 नोकर कपात करणार) : आईबीएमचे मुख्य आर्थिक अधिकारी जेम्स कॅव्हनॉफ म्हणाले, 'आम्ही गेल्या काही वर्षांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण पोर्टफोलिओ कृती केल्या आहेत, ज्यामुळे आमच्या व्यवसायात काही लॉक खर्च झाले आहेत.' आम्ही या वर्षाच्या सुरुवातीला या उर्वरित खर्चांची पुर्तता करण्याची अपेक्षा करतो आणि पहिल्या तिमाहीत अंदाजे $300 दशलक्ष शुल्क वाचविण्याची अपेक्षा करतो.

स्पोटिफाई (600 नोकऱ्यांमध्ये कपात) : स्पोटिफाईचे CEO डॅनियल म्हणाले, 'इतर अनेक उद्योजकांप्रमाणेच, मला साथीच्या रोगाकडून तीव्र प्रतिकूल प्रतिक्रिया अपेक्षित होती आणि विश्वास होता की, आमचा व्यापक जागतिक व्यवसाय आणि जाहिरातीतील मंदीच्या प्रभावाचा कमी झालेला परिणाम आम्हाला प्रेरित करेल.' माझ्या कमाईत वाढ होण्यापूर्वी मी गुंतवणूक करण्यात खूप महत्त्वाकांक्षी होतो.



हेही वाचा : Employees Lay Off : 2023 मध्ये कर्मचाऱ्यांना मोठा झटका, मोठ्या टेक कंपन्या देणार अनेकांना नारळ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.