ETV Bharat / bharat

Sher Mohammad Abbas Stanekzai: तालिबानच्या प्रमुख नेत्याचे उत्तराखंडच्या भारतीय लष्करी अकादमीशी जुने संबंध

author img

By

Published : Aug 19, 2021, 7:17 AM IST

Updated : Aug 19, 2021, 1:52 PM IST

शेर मोहम्मद अब्बास स्टॅनेकझाई
Sher Mohammad Abbas Stanekzai Padshah Khan

तालिबान सरकारची घोषणा झाल्यापासून काही प्रमुख तालिबानी नेते चर्चेत आहेत. यापैकीच एक म्हणजे शेर मोहम्मद अब्बास स्टॅनेकझाई. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, की स्टॅनेकझाई यांचे भारताशीही जुने संबंध आहेत. त्यांनी 1970 च्या दशकात उत्तराखंडच्या डेहराडून येथील भारतीय लष्करी अकादमी (IMA) मध्ये अफगाण सैनिकांसोबत प्रशिक्षण घेतले होते.

नवी दिल्ली - अफगाणिस्तानात पुन्हा एकदा तालिबानची ताकद वाढली झाली आह. लवकरच त्याचे सरकार स्थापन होणार आहे. जगातील जवळजवळ प्रत्येक देश अफगाणिस्तानमधील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करत आहे. तालिबान सरकारची घोषणा झाल्यापासून काही प्रमुख तालिबानी नेते चर्चेत आहेत. यापैकीच एक म्हणजे शेर मोहम्मद अब्बास स्टॅनेकझाई. हे अफगाण तालिबानचे वरिष्ठ नेता आहेत. 2001 मध्ये तालिबानची सत्तेवरून हकालपट्टी झाल्यापासून तो दोहामध्ये राहत होते.

हेही वाचा- पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी शेकडो लोकांचा TikTok स्टार तरुणीशी घृणास्पद प्रकार, बघा VIDEO

स्टॅनेकझाईहे कट्टर धार्मिक नेते असल्याचे म्हटले जाते. 2015 मध्ये त्यांना दोहा येथील तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे प्रमुख बनवण्यात आले. त्यानंतर त्यांनी अफगाणिस्तान सरकारसोबत झालेल्या शांतता चर्चेत भाग घेतला होता. याशिवाय, ते अमेरिकेबरोबरच्या शांतता करारामध्ये सामील होते. त्यांनी आतापर्यंत अनेक देशांच्या राजकीय दौऱ्यांमध्ये तालिबानचे प्रतिनिधित्व केले आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, की स्टॅनेकझाई यांचे भारताशीही जुने संबंध आहेत. त्यांनी 1970 च्या दशकात उत्तराखंडच्या डेहराडून येथील भारतीय लष्करी अकादमी (IMA) मध्ये अफगाण सैनिकांसोबत प्रशिक्षण घेतले होते.

हेही वाचा- तर तालिबानसोबत भारताने राजनैतिक संबंध प्रस्थापित करावे'; माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांचा सल्ला

अनेकदा आपल्या भाषणांमध्ये IMA कडून मिळालेल्या प्रशिक्षणाचा ते उल्लेख करतात. तालिबानच्या सर्व नेत्यांमध्ये शेर मोहम्मद अब्बास स्टॅनेकझाई हे सुशिक्षित असल्यामुळे त्यांना अधिक हुशार मानले जाते. तर बहुतेक नेत्यांनी अफगाणिस्तान किंवा पाकिस्तानमधील मदरशांमधून शिक्षण घेतले आहे. 1963 मध्ये अफगाणिस्तानच्या लोगार प्रांतातील बरक जिल्ह्यात जन्मलेले स्टॅनेकझाई पश्तून मुस्लिम आहेत.

हेही वाचा- व्हिडिओ: तालिबान्यांची लूट सुरु, जागोजागी अशी करताहेत मौजमस्ती

पाकच्या ISI कडूनही प्रशिक्षण घेतले -

आयएमएपूर्वी त्यांनी राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली होती. पण नंतर ते पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI मध्ये सामील झाले. शेर मोहम्मद अब्बास स्टॅनेकझाई यांनी पाकिस्तान लष्कर आणि त्यांची गुप्तचर संस्था ISI कडून प्रशिक्षण घेतले. 1996 मध्ये ते अमेरिकेतही गेले होते. जिथे त्यांनी तत्कालीन क्लिंटन सरकारला तालिबान शासित अफगाणिस्तानला मान्यता देण्यास सांगितले. असे म्हटले जाते, की त्यांचे ISI शी घनिष्ठ संबंध आहेत. तालिबानच्या नवीन सरकारमध्ये त्यांना कोणत्या पद दिले जाईल, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

हेही वाचा - VIDEO : काबूल विमानतळावरील 'तो' थरार अन् गोंधळ ऐका प्रत्यक्षदर्शी डॉ. पराग रबडे यांच्या तोंडून

हेही वाचा - ही आहे महाराष्ट्राची "निरजा", अमरावतीच्या या लेकीने 129 भारतीयांना सुखरुप मायदेशी आणले

Last Updated :Aug 19, 2021, 1:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.