ETV Bharat / international

पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी शेकडो लोकांचा TikTok स्टार तरुणीशी घृणास्पद प्रकार, बघा VIDEO

author img

By

Published : Aug 18, 2021, 5:53 PM IST

Updated : Aug 18, 2021, 7:37 PM IST

हा व्हिडिओ पाकिस्तानच्या लाहोरमधील आहे. 14 ऑगस्ट म्हणजे पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनालाच हा लांछनास्पद प्रकार घडला आहे. संबंधित महिला ही टिकटॉक स्टार आहे.

women cloths torn
women cloths torn

हैदराबाद - पाकिस्तानमध्ये बॉम्बस्फोट होण्याच्या घटना नवीन नाहीत. मात्र आता एक अजब प्रकार निदर्शनास आला आहे. एका महिलेला जवळपास 400हून अधिक नागरिकांच्या जमावाने हवेत फेकत तिचे कपडे फाडले आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

हेही वाचा - धक्कादायक! नाशिकमधील प्रांताधिकाऱ्याची नियत घसरली, तलाठी महिलेकडे शरीर सुखाची मागणी

महिला टिकटॉकस्टार

हा व्हिडिओ पाकिस्तानच्या लाहोरमधील आहे. 14 ऑगस्ट म्हणजे पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनालाच हा लांछनास्पद प्रकार घडला आहे. संबंधित महिला ही टिकटॉक स्टार आहे. ती तिच्या सहकाऱ्यांसह मिनार-ए-पाकिस्तान येथे व्हिडिओ करत होती. त्याचवेळी तेथील जमावाने तिच्यावर हल्ला केला. जमाव अत्यंत आक्रमक झाला. त्यांनी संबंधित महिलेला मारहाणच केली नाही, तर तिचे कपडे फाडले आणि हवेत फेकून दिले.

हेही वाचा - हनी ट्रॅपमध्ये अडकवून निवृत्त लष्करी अधिकाऱ्याला लुटले; दोघांना अटक

400 जणांविरोधात गुन्हा

जमावाने हल्ला केला त्यावेळी महिला घाबरली होती. तिने मदतीसाठी याचनाही केली, मात्र कोणीही तिच्या मदतीला आले नाही. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून या महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी करून 400जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर मिनार पाकिस्तान असा हॅश्टॅग सध्या ट्रेंड आहे.

Last Updated : Aug 18, 2021, 7:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.