ETV Bharat / bharat

Puncture Mechanic Son Becomes Judge : पंक्चरवाल्याचा मुलागा झाला न्यायाधीश, वाचा अहद अहमदची यशोगाथा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 24, 2023, 1:52 PM IST

puncture mechanic son Becomes Judge
पंक्चरवाल्याचा मुलागा झाला न्यायाधीश

puncture mechanic son Becomes Judge : पंक्चर काढणाऱ्या कामगाराचा मुलगा न्यायाधीश झाल्यानं मोठा जल्लोष साजरा करण्यात येत आहे. अहद अहमद असं न्यायाधीश झालेल्या पंक्चर कामगाराच्या मुलाचं नाव आहे. अहद अहमद यानं उत्तरप्रदेश लोकसेवा आयोगानं घेतलेल्या परीक्षेत हे यश मिळवलं आहे.

लखनऊ puncture mechanic son Becomes Judge : पंक्चर काढणाऱ्या कामगाराचा मुलगा न्यायाधीश झाल्यानं मोठा जल्लोष साजरा करण्यात येत आहे. अहद अहमद असं न्यायाधीश बनलेल्या पंक्चर कामगाराच्या मुलाचं नाव आहे. उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाने घेतलेल्या पीसीएस जे ( PCS J ) 2022 चा निकाल जाहीर केला. या परीक्षेत अहद अहमदनं हे यश मिळवलं आहे. अहद अहमद हा प्रयागराजमधील नवाबगंज परिसरात राहणारा आहे. विशेष म्हणजे अहदच्या वडिलांनी त्याच्या शिक्षणासाठी कर्ज घेऊन त्याला शिकवलं आहे. मुलगा न्यायाधीश बनल्याचं समजताच त्याच्या आई वडिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले आहेत.

puncture mechanic son Becomes Judge
पंक्चरवाल्याचा मुलागा झाला न्यायाधीश

वडील चालवतात पंक्चरचं दुकान : प्रयागराजमध्ये नवाबगंज परिसरातील बरई हरक या गावात अहद अहमदचे वडील शहजाद हे पंक्चरचं दुकान चालवतात. यासह शहजाद छोटसं किराणा दुकानही चालवतात. तर अहदची आई कपडे शिवण्याचं काम करते. फावल्या वेळेत अहदही त्याच्या आई वडिलांच्या कामात मदत करत होता. त्यानं पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर एलएलबीचं शिक्षण घेतलं. त्यानंतर कठोर परिश्रम घेऊन तो यशस्वी झाला आहे. मुलाच्या यशानं त्याच्या आई वडिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत आहेत.

puncture mechanic son Becomes Judge
पंक्चरवाल्याचा मुलागा झाला न्यायाधीश

पहिल्याच प्रयत्नात मिळालं यश : अहद अहमद यांना बिए केल्यानंतर एलएलबीचं शिक्षण घेतलं आहे. एलएलबी करुन त्याला वकिली करायची होती. मात्र कोरोना काळात त्याचं वकिली करायचं शक्य झालं नाही. त्यामुळे अहदनं पीसीएस जे या परीक्षेची तयारी करायचं ठरवलं. घरची आर्थिक परिस्थिती कोचिंग लावण्यासारखी नसल्यानं अहदनं घरीच चयारी सुरू केली. त्याचे वडील शहजाद आणि आई अफसाना यांना चार मुलं असून अहदनं पहिल्याच प्रयत्नात यश मिळवलं आहे. त्याचे इतर भावंडंही अभ्यास करुन सक्षम झाली आहेत.

puncture mechanic son Becomes Judge
पंक्चरवाल्याचा मुलागा झाला न्यायाधीश

गावातील नागरिकांनी केलं कौतुक : उत्तरप्रदेश लोकसेवा आयोगानं घेतलेल्या पीसीएस जे परीक्षेत अहद अहमदनं यश मिळवून तो न्यायाधीश झाला. त्यामुळे गावाकऱ्यांनी त्याचं कौतुक केलं. अहदनं राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवून गावाचं नाव रोषण केलं, त्यामुळे गावकरी अभिमान व्यक्त करत आहेत.

puncture mechanic son Becomes Judge
पंक्चरवाल्याचा मुलागा झाला न्यायाधीश

आईचं स्वप्न मुलानं केलं पूर्ण : हिंदी चित्रपटात कष्टकरी मजुरांची मुलं मोठी होऊन अधिकारी होतात. त्यांच्या पालकांची स्वप्न पूर्ण करतात, असं पाहिल्याचं अहदची आई अफसाना यांनी सांगितलं. त्यामुळे आपल्या मुलाला शिकवून मोठं अधिकारी करण्याचं आम्ही ठरवलं होतं. त्यासाठी कुटूंबाचं उत्पन्न वाढवण्यासाठी कपडे शिवण्याचं काम स्वीकारल्याचं अफसाना यांनी यावेळी सांगितलं. मुलगा अहद हा न्यायाधीश झाला, त्यामुळे जागेपणी पाहिलेलं त्याच्या आईचं स्वप्न साकार झालं. 'आई वडिलांनी प्रामाणिकपणानं मेहनत करुन मला शिकवलं, त्यामुळे आपण प्रामाणिकपणानं काम करुन त्यांचा गौरव करणार आहे' असं अहदनं यावेळी सांगितलं.

हेही वाचा :

  1. MPSC Result : सासरच्या पाठिंब्याने तिसऱ्यांदा एमपीएससी परीक्षेत यश, ऐश्वर्या नाईक-डुबल यांची महापालिका मुख्याधिकारीपदी निवड
  2. Success Story : गर्भवती असतानाच पतीचे निधन; जिद्द अन् मेहनतीच्या जोरावर मोहिनीने गाठला यशाचा शिखर
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.