ETV Bharat / bharat

NALSAR University : नालसार युनिव्हर्सिटीमध्ये LGBTQ+ समुदायासाठी जागा राखीव

author img

By

Published : Mar 28, 2022, 7:38 PM IST

हैदराबादच्या NALSAR युनिव्हर्सिटी ऑफ लॉने जस्टिस सिटी, शमीरपेट येथील त्यांच्या कॅम्पसच्या GH-6 चा तळमजला LGBTQ+ (Gender-Neutral Space) समुदायासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.

NALSAR University
NALSAR University

हैदराबाद : हैदराबादच्या नॅशनल अकादमी ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च (NALSAR) युनिव्हर्सिटी ऑफ लॉने ट्विटर हँडलवर एक घोषणा केली. हैदराबादच्या जस्टिस सिटी, शमीरपेट येथील त्यांच्या कॅम्पसच्या GH-6 चा तळमजला LGBTQ+ (Gender-Neutral Space) समुदायासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.

  • We are pleased to share that in our endeavour to make our campus a truly inclusive space, the ground floor of GH-6 has been designated as a gender neutral space with rooms allotted to students self-identifying as members of the LGBTQ+ community, with plans to move towards a pic.twitter.com/163JeSGQ99

    — NALSAR University of Law (@NALSAR_Official) March 26, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

@NALSAR_Official या ट्विटर हँडलवर शनिवार, 26 मार्च रोजी सकाळी हे ट्विट करण्यात आले होते. यात योग्य वेळी लैंगिक तटस्थ वसतिगृहांसाठी योजना सुरू असल्याचेही सांगितले होते. शैक्षणिक ब्लॉकच्या तळमजल्यावरील वॉशरूमही लिंग तटस्थ शौचालय म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नालसारचे कुलसचिव प्रा. व्ही बालकिस्ता रेड्डी यांनी याबद्दल सांगितले.

LGBTQ+ धोरण अंतिम टप्प्यात

संस्था अधिक सर्वसमावेशक आणि सर्वांसाठी सोयीस्कर बनवण्याच्या दिशेने हे एक पाऊल आहे, असे बालकिस्ता म्हणाले. LGBTQ+ समुदायासाठी जागा राखीव ठेवणे हे आमचे अंतिम धोरण आहे. आणि ट्विटमध्ये नमूद केल्याप्रमाणे अंतिम धोरणाचा मसुदा तयार करण्याच्या प्रक्रियेत आहे. याआधी जून 2015 मध्ये, 22 वर्षीय बीए एलएलबी विद्यार्थ्याने पदवी प्रमाणपत्रात लिंगाचा उल्लेख करू नये अशी विनंती केली होती. विद्यापीठाने तात्काळ विनंती स्वीकारली आणि न्यूट्रल उपसर्ग 'MX' वापरला.

हेही वाचा - Changes From 1st April 2022 : नवीन आर्थिक वर्षात पोस्ट ऑफिस योजनेसह विविध क्षेत्रात बदल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.