ETV Bharat / bharat

Monsoon Update : म्हणून होतोय मान्सूनला उशीर..महाराष्ट्रात 'या' दिवशी दाखल होणार

author img

By

Published : Jun 9, 2023, 6:43 PM IST

मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. देशातील इतर राज्यांमध्ये मान्सून कधी पोहोचणार याबाबत हवामान खात्याने पुन्हा नवी तारीख जाहीर केली आहे. यावेळी मान्सूनला उशीर होण्याचे कारण काय होते, जाणून घेऊया सविस्तर.

Monsoon Update
मान्सून अपडेट

नवी दिल्ली : गुरुवारी मान्सूनने केरळमध्ये हजेरी लावली. त्यानंतर आता तो देशातील इतर राज्यांमध्ये पोहोचेल. हवामान खात्याने वेगवेगळ्या राज्यांसाठी मान्सून आगमनाच्या वेगवेगळ्या तारखा जाहीर केल्या आहेत. केरळनंतर मान्सून एका दिवसात कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये दाखल होणार आहे. यानंतर तो 9-12 जूनपर्यंत देशाच्या ईशान्य भागात पोहोचेल. नंतर इतर राज्यांचा क्रमांक येईल. यावेळी चक्रीवादळ बिपरजॉय मुळे मान्सून उशीरा दाखल झाला, असे हवामान खात्याने म्हटले आहे. या वादळामुळे गुजरात, गोवा, केरळ आणि कर्नाटकला फटका बसू शकतो. या राज्यांना आधीच अलर्ट जारी करण्यात आला आहे. इतर राज्यांमध्ये काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यापूर्वी मान्सूनबद्दल जाणून घेऊया.

मान्सून दाखल होण्याची तारीख :

  • केरळ - 8 जून
  • कर्नाटक - 8 जून
  • तामिळनाडू - 8 जून
  • महाराष्ट्र - 10 जून
  • छत्तीसगड - 15 जून
  • झारखंड - 15 जून
  • मध्य प्रदेश - 15 जून
  • बिहार - 15 जून
  • उत्तर प्रदेश - 20 जून
  • गुजरात - 20 जून
  • राजस्थान - 20 जून
  • दिल्ली - 30 जून
  • पंजाब - 30 जून
  • हरियाणा - 30 जून

मान्सून आला हे कशाच्या आधारावर ठरवले जाते? : हवामान खाते यासाठी तीन स्केल वापरते. यासाठी वाऱ्याचा प्रवाह नैऋत्येकडे असावा लागतो. कर्नाटक, केरळ आणि लक्षद्वीपमधील 14 स्थानकांवरून पावसाचे निरीक्षण केले जाते, त्यापैकी 60 टक्के स्थानकांवर दोन दिवस किमान 2.5 मिमी पाऊस पडला असावा. ही स्थानके आहेत - कोझिकोडे, त्रिचूर, कन्नूर, कुडुलू, मंगलोर, कोची, अलाप्पुझा, कोल्लम, मिनिकॉय, थलासेरी, अमिनी, तिरुवनंतपुरम, पुनालूर आणि कोट्टायम. तिसरी स्थिती आहे - ढग किती जास्त आणि किती दाट आहेत.

मान्सून शब्दाचा उगम : मान्सून हा अरबी शब्द 'मौसीम'पासून आला आहे. हा शब्द अल मसूदी नावाच्या लेखकाने दिला आहे. याचा अर्थ - मोसमी वारे. मान्सून दोन प्रकारचा असतो. पहिला उन्हाळा पावसाळा आणि दुसरा हिवाळा पावसाळा. उन्हाळी मान्सूनला दक्षिण पश्चिम मान्सून असेही म्हणतात. त्याचा कालावधी जून ते सप्टेंबर पर्यंत असतो. हिवाळी पावसाळ्याला परतीचा मान्सून म्हणतात. तो ऑक्टोबर ते डिसेंबर पर्यंत चालतो. त्यामुळे तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात पाऊस पडतो. नैऋत्य मान्सून केरळच्या किनारपट्टीवर दाखल होतो. त्यानंतर तो हळूहळू उत्तरेकडे सरकतो.

केरळमध्ये मान्सून दाखल : यावेळी मान्सून केरळमध्ये उशिरा दाखल झाला आहे. 8 जून रोजी मान्सूनने येथे धडक दिली. केरळमधील काही जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. यलो अलर्ट म्हणजे - 6 सेमी ते 11 सेमी पाऊस पडणे. यापेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता असताना ऑरेंज अलर्ट जारी केला जातो. केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (KSDMA) चे सदस्य सचिव शेखर लुकोस कुरियाकोसे म्हणाले, 'ही फक्त सुरुवात आहे. येत्या 2-3 आठवड्यांत पावसाचा जोर वाढेल आणि मान्सूनच्या उशिरा आगमनाची भरपाई होईल, अशी आम्हाला आशा आहे.

हेही वाचा :

  1. Monsoon Update : ऐकलं का! केरळात मान्सून आलाय म्हणे; पण राज्यात कधी येणार, जाणून घ्या काय नवी अपडेट
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.