ETV Bharat / state

Monsoon Update : ऐकलं का! केरळात मान्सून आलाय म्हणे; पण राज्यात कधी येणार, जाणून घ्या काय नवी अपडेट

author img

By

Published : Jun 9, 2023, 10:41 AM IST

नैऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. आता तो महाराष्ट्राच्या दिशेने सरकण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Monsoon Update
मान्सून महाराष्ट्रात कधी येणार

मुंबई: केरळात मान्सून दाखल झाल्याचे वृत्त येताच राज्यातील शेतकरी महाराष्ट्र पाऊस कधी होणारा याची विचारणा करू लागले आहेत. मान्सून पावसाची सुरुवात झाल्यानंतर शेतकरी शेतीच्या कामाला सुरुवात करतील. परंतु राज्यात वरुणराजा कधी कृपा दाखवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण मान्सून 7 उशिराने केरळात पोहोचला आहे. यामुळे महाराष्ट्राकडे मान्सूनची वाटचाल कशी असेल याकडे हवामान विभाग लक्ष ठेवून आहे.

या तारखेला येत असोत मान्सून : मान्सूनच्या प्रत्येक प्रगतीकडे हवामान खात्याचे लक्ष असल्याची माहिती हवामान खात्याच्या (IMD) अधिकाऱ्याने दिली आहे. आयएमडी प्रादेशिक हवामान केंद्राचे मुंबई प्रमुख एस.जी. कांबळे म्हणाले की,महाराष्ट्रात 10 जून आणि मुंबईत 11 जून ही मान्सून सुरू होण्याची सामान्य तारीख आहे. त्याच दरम्यान बिपरजॉय हे चक्रीवादळ मुंबईपासून साधरण 880 किलोमीटरवर सक्रीय आहे. पुढील काही तीन दिवसात हे वादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

  • Very Severe Cyclonic Storm #Biparjoy over east-central Arabian Sea, lay centred at 17.30hrs IST of today, about 850 km west of Goa, 880 km southwest of Mumbai, 890 km south-southwest of Porbandar and 1170 km south of Karachi. To intensify further during the next 3 days: IMD pic.twitter.com/D6H19q5gmE

    — ANI (@ANI) June 8, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हवामान विभागाचे लक्ष : मान्सूनविषयी अधिकची माहिती देताना अधिकारी पुढे म्हणाले की, 'मान्सूनच्या प्रगतीवर लक्ष ठेवले जात आहे. येत्या दोन-तीन दिवसांत महाराष्ट्रात मान्सून सुरू होईल. मुंबईत मान्सून सुरू होण्याची सामान्य तारीख 11 जून आहे. महाराष्ट्रात मान्सून सुरू होण्याची सामान्य तारीख 10 जून आहे, जेव्हा तो दक्षिण कोकणात प्रवेश करत असतो. हवामान खात्याच्या अधिकार्‍यांनी यापूर्वी सांगितले होते की ,चक्रीवादळ बिपरजॉयचा मान्सूनच्या तीव्रतेवर परिणाम होत आहे. केरळवर त्याचा सौम्य परिणाम जाणवेल.

परिस्थितीत अनुकूल असावी : हवामान विभागाच्या (IMD) मते, नैऋत्य मान्सूनची उत्तर सीमा लक्षद्वीपच्या मिनिकॉय बेटावरून जाते. दक्षिण अरबी समुद्रावर पश्चिमेकडील वाऱ्यांचा जोर वाढल्याने परिस्थिती अनुकूल होत असल्याचे हवामान खात्याने यापूर्वी सांगितले होते. यासोबतच पश्चिमेकडील वाऱ्यांची तीव्रता हळूहळू वाढत आहे. आग्नेय अरबी समुद्रावरही ढगांचे प्रमाण वाढत आहे. पुढील 3 ते 4 दिवसांत मान्सून सुरू होण्यासाठी या अनुकूल परिस्थितीत आणखी सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा -

  1. Monsoon 2023 : हुश्श ! केरळात मान्सून दाखल, विदर्भात पुढील तीन दिवसात पावसाची शक्यता
  2. Rain In Thane : भिवंडी ग्रामीण भागात अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याचे तांडव; घरांसह झाडांची पडझड
  3. unseasonal rain in Nanded : वादळी वाऱ्यामुळे नांदेडमधील केळी बागा पडल्या आडव्या; सरकारकडे शेतकऱ्यांची मदतीची हाक
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.