मुंबई : नाशिक, मुंबई,नागपूर, आणि यवतमाळसारख्या शहरांमध्ये आज पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलले आहेत. पेट्रोलच्या किमती जाणून घ्या. किमती ( Petrol diesel rate today जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना पूर्वीपेक्षा काहीसा दिलासा मिळाला असला तरी महागाईचा बोजा कायम आहे. यासोबतच भाज्यांचे दरही लोकांचे बजेट डळमळीत करत आहेत.
![Petrol Diesel Rate](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/17154152_petrol.jpg)
महागाईचे गणित : भारताच्या एकूण इंधन खपाच्या ८० टक्के इंधनाची गरज आयातीमधून भागवली जाते. त्यामुळे इंधनाचा भाव आणि रुपया-डॉलर चलन विनिमय कंपन्यांसाठी महत्वाचा असतो. पेट्रोल डिझेलच्या दरांवर सर्वसामान्यांचे महागाईचे गणित ठरत असते. त्यामुळे नागरिकांचे नेहमीच पेट्रोल डिझेल (Petrol Disel) दरांकडे लक्ष असते. जाणून घ्या आजचे दर ( Petrol diesel rate today 1 December ) काय आहेत.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काय बदल आहेत : नाशिकमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 04 पैसे, तर डिझेलचा दर 93 रुपये 27 पैसे आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 31 पैसे आहे, तर डिझेल 94 रुपये 27 पैसे. अहमदनगर जिल्ह्यात पेट्रोलचा दर 106 रुपये 96 पैसे तर डिझेलचा दर 93 रुपये 46 पैसे. पेट्रोलच्या दरात यवतमाळ शहरात 107 रुपये 03 पैसे तर डिझेलचा दर 93 रुपये 55 पैसे आहे. पुणे पेट्रोलचा दर 105 रुपये 96 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 48 पैसे आहे.