ETV Bharat / bharat

Mobile Explosion: मोबाईलचा पँन्टच्या खिशात स्फोट, तरुण झाला गंभीर जखमी

author img

By

Published : May 9, 2023, 9:57 PM IST

केरळमधील कालिकतमध्ये मोबाईलचा स्फोट झाल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ते त्यांच्या कार्यालयात असताना ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्या सहकाऱ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मोबाईल कंपनीवर गुन्हा दाखल करणार असल्याचे पीडित तरुणाचे म्हणणे आहे.

Mobile Explosion
Mobile Explosion

कालिकत (केरळ) : केरळमधील कालिकतमध्ये मोबाईलचा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. येथे पॅन्टच्या खिशात ठेवलेल्या मोबाईलचा स्फोट झाल्याने एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 23 वर्षीय फारिस रहमान हा मूळचा पय्यानक्कल, कालिकतचा रहिवासी असून, तो रेल्वे कंत्राटी कर्मचारी आहे. ही घटना मंगळवारी पहाटेची आहे. फरीस रहमान कार्यालयात पोहोचल्यानंतर तो बाथरूममध्ये गेला असता, यादरम्यान त्याच्या खिशात ठेवलेला मोबाइलचा स्फोट झाला.

२ वर्षांपूर्वी Realme 8 हा मोबाईल : मोबाईलच्या स्फोटामुळे त्याच्या जीन्सला आग लागली आणि त्याचा फोन पूर्णपणे जळून खाक झाला. सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी आग विझवली, त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. फोनच्या बॅटरीला आग लागल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. स्फोटाबाबत 'रियलमी' या मोबाईल कंपनीविरोधात ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल करणार असल्याचे फारिस याने सांगितले आहे. त्याने २ वर्षांपूर्वी Realme 8 हा मोबाईल खरेदी केला होता.

स्फोटात मुलीचा जागीच मृत्यू : गेल्या महिन्यांत अशीच एक घटना उघडकीस आली होती, ज्यामध्ये थिरुविलुमाला, थ्रिसूर येथे एका आठ वर्षांच्या मुलीच्या मोबाईल फोनचा स्फोट होऊन तिचा मृत्यू झाला. 24 एप्रिल रोजी झालेल्या स्फोटात अशोक कुमार आणि सौम्या यांची मुलगी आदित्यश्री यांचा मृत्यू झाला होता. रात्री साडेदहाच्या सुमारास ती वडिलांच्या मोबाईलवर व्हिडिओ पाहत असताना ही घटना घडली. या स्फोटात मुलीचा जागीच मृत्यू झाला.

मोबाईलबाबत या गोष्टी ठेवा लक्षात : मोबाईल फोनमध्ये स्फोट अनेक कारणांमुळे होऊ शकतो. पण मुख्य कारण म्हणजे त्यातील बॅटरी. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की चार्जिंगच्या वेळी बॅटरी खूप गरम झाली तर मोबाइलची रासायनिक रचना खराब होऊ शकते, ज्यामुळे त्याचा स्फोट होऊ शकतो. स्फोटाचा धोका कमी करण्यासाठी आणि नुकसान होण्याची शक्यता कमी करण्यासाठी झोपेत मोबाइल चार्ज करू नये, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. फोन सुमारे 30 टक्के बॅटरी लाइफवर चार्ज करा आणि तो जास्त चार्ज होऊ नये असेही ते म्हणाले आहेत.

हेही वाचा : कर्नाटकच्या सार्वभौमत्वावरुन सोनिया गांधींचा हल्लाबोल, निवडणूक आयोगाने मागितले स्पष्टीकरण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.