ETV Bharat / bharat

Election Commission Notice To Sonia Gandhi : कर्नाटकच्या सार्वभौमत्वावरुन सोनिया गांधींचा हल्लाबोल, निवडणूक आयोगाने मागितले स्पष्टीकरण

author img

By

Published : May 9, 2023, 7:12 AM IST

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार सोमवारी संपला आहे. आता 10 मेला कर्नाटक विधानसभेसाठी मतदान होणार आहे. मात्र भाजप आणि काँग्रेसमध्ये सुरू असलेले आरोप प्रत्यारोप अद्यापही थांबले नाहीत.

Election Commission Notice To Sonia Gandhi
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचाराच्या तोफा सोमवारी थंडावल्या आहेत. मात्र कर्नाटक विधानसभा निवडणुकीवर सुरु झालेले राजकारण आणखी पेटले आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी सोशल मीडियावर कर्नाटकच्या सार्वभौमत्वावरुन पोस्ट केली होती. मात्र या पोस्टवरुन आता चांगलेच राजकारण पेटले आहे. भाजपने याबाबत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने काँग्रेस अध्यक्षांना यावर स्पष्टीकरण मागणारे पत्र पाठवले आहे.

  • CPP Chairperson Smt. Sonia Gandhi ji sends a strong message to 6.5 crore Kannadigas:

    "The Congress will not allow anyone to pose a threat to Karnataka's reputation, sovereignty or integrity." pic.twitter.com/W6HjKYWjLa

    — Congress (@INCIndia) May 6, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काय होती काँग्रेसची पोस्ट : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजपवर चांगलाच हल्लाबोल केला होता. कर्नाटकच्या प्रतिष्ठा, एकता आणि सार्वभौमत्वाला धक्का लावलेला काँग्रेस कधीही सहन करणार नसल्याचे सोनिया गांधी यांनी यावेळी स्पष्ट केले होते. त्यांच्या या वक्तव्याची काँग्रेसने सोशल मीडियात पोस्ट करत सोनिया गांधी यांनी कर्नाटकच्या नागरिकांना जोरदार संदेश दिल्याचा उल्लेख केला होता. त्यामुळे सोनिया गांधी यांच्या या वक्तव्याचा भाजपकडून चांगलाच खरपूस समाचार घेण्यात आला.

काँग्रेसची मान्यता रद्द करुन गुन्हा दाखल करा : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी कर्नाटकसाठी सार्वभौमित्व हा शब्द वापरल्याने भाजपने काँग्रेसवर मोठा हल्लाबोल केला. काँग्रेसची मान्यता रद्द करुन सोनिया गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप नेत्यांनी केली आहे. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या शिष्टमंडळाने दिल्लीतील निवडणूक समितीला या मुद्द्यावर निवेदन सादर केले. कर्नाटक हे भारतीय संघराज्यातील एक अतिशय महत्त्वाचे राज्य आहे. भारतीय संघराज्यातील राज्याच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्याचे सोनिया गांधी यांनी स्पष्ट केले आहे. मात्र ही सरळसरळ अलिप्ततेची हाक असून ते घातक असल्याचे यावेळी भाजप नेत्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सोनिया गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करुन काँग्रेसची मान्यता रद्द करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

हा तर कर्नाटकला भारतापासून वेगळे करण्याचा डाव : भाजपचे खासदार अनिल बलुनी, नेते ओम पाठक तरुण चुग यांनी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाकडे याबाबतची तक्रार केली. यावेळी या शिष्टमंडळाने लोकप्रतिनिधी कायद्याचा हवाला देत काँग्रेस पक्षाची मान्यता रद्द केली पाहिजे असे स्पष्ट केले. भाजपने या मुद्द्यावर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचा हवाला देत काँग्रेसच्या ट्विटची प्रतही सादर केली. सोनिया गांधी यांनी केलेल्या या वादग्रस्त वक्तव्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी त्यांच्या जाहीर सभांमध्ये उल्लेख करुन काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेस पक्ष कर्नाटकला भारतापासून वेगळे करण्याचे खुलेपणाने समर्थन करत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. तुकडे तुकडे टोळीचा आजार काँग्रेसच्या वरच्या स्तरावर पोहोचल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

भाजप का करते कर्नाटकची बदनामी : कर्नाटकचे प्रभारी काँग्रेस सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी याप्रकरणी भाजपवर जोरदार पलटवार केला. कर्नाटक निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपची निराशा झाल्याचे दिसून येत आहे. भाजप कर्नाटकच्या स्वाभिमानाची बदनामी का करत आहे या एका प्रश्नाचे उत्तर देण्यास पंतप्रधानांनी नकार दिला. त्यामुळे त्यांचा हा खोटेपणा असल्याचेही रणदीप सुरजेवाला यांनी स्पष्ट केले.

हेवी वाचा -

तेलंगणात लोकांची स्वप्ने पूर्ण होत नाहीत, आम्ही युवकांच्या मागण्या अंमलात आणू -प्रियांका गांधी

Karnataka Election 2023 : 'कर्नाटकात मुस्लिम आरक्षण वाढवण्यासाठी काँग्रेस कुणाच्या आरक्षणाला कात्री लावणार?'

Amritsar Blast : अमृतसर हादरले, गोल्डन टेम्पल परिसरात झाला दुसरा स्फोट; वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.