ETV Bharat / bharat

ICC CWC 2023 India vs Pakistan : विश्वचषकातील महामुकाबल्यामुळे हॉटेल्स व्यावसायिकांची 'चांदी', हॉटेलमधील रुमच्या किमती गगनाला

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 12, 2023, 11:17 AM IST

ICC CWC 2023 India vs Pakistan
ICC CWC 2023 India vs Pakistan

ICC CWC 2023 India vs Pakistan : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 14 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात 'हाय व्होल्टेज' सामना होणार आहे. या सामन्याच्या पार्श्वभूमीवर सध्या अहमदाबादमधील बहुतांश पंचतारांकित हॉटेल्स 'हाऊसफुल्ल' झाल्या असून अनेक हॉटेलमधील रुमच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.

अहमदाबाद ICC CWC 2023 India vs Pakistan : अहमदाबाद येथील जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये विश्वचषकातील बहुप्रतीक्षित भारत आणि पाकिस्तान सामन्यापूर्वी शहरातील बहुतांश पंचतारांकित हॉटेलच्या खोल्या उच्च दरानं बुक करण्यात आल्या आहेत. या सामन्यापुर्वी परदेशातील अनिवासी भारतीय आणि राज्यातील क्रिकेटप्रेमींनी शहरातील पंचतारांकित हॉटेल्सबरोबरच गेस्टहाऊस, पीजी सुविधा असलेल्या खोल्या, क्लब गेस्टहाऊसपासून सामान्य हॉटेल्सपर्यंतच्या सर्व खोल्या बुक केल्या आहेत.

  • Updates on some hotel charges ahead of India vs Pakistan match. [Espn Cricinfo]

    - Star hotels charging upwards of 3,50,000 for 2 nights.

    - An average hotel that was 4000 per night has increased to 60,000 pic.twitter.com/vcmXI7egEs

    — Johns. (@CricCrazyJohns) August 15, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

बहुतांश हॉटेल्स हाऊसफुल्ल : प्रसिद्ध हॉटेल चेन 'हयात रेसीडेन्सी'शी संबंधित असलेल्या रीनानं ईटीव्ही भारतला दूरध्वनीवरून सांगितलं की, अहमदाबादेतील आश्रम रोडवर असलेल्या हयात रेसीडेन्सीमध्ये खोल्या उपलब्ध नाहीत. फक्त प्रीमियम डिप्लोमॅट सूट उपलब्ध आहेत. या सूटचं 24 तासांचं भाडं करासहीत 2.40 लाख रुपये आहे. तसंच शहरातील वस्त्रापूर येथील हयात हॉटेलमधील रुमचं शुल्क 13 आणि 14 ऑक्टोबर रोजी करासह 75 हजार रुपये असेल. यात नाश्त्याचाही समावेश असणार आहे.

  • Hotel charges in Ahmedabad ahead of India vs Pakistan match in World Cup 2023:- (ESPNcricinfo)

    •An average hotels - 4000 per night to 60,000 rupees.

    •Star hotels - 3,50,000 for 2 nights. pic.twitter.com/GYHY6Y3fLd

    — CricketMAN2 (@ImTanujSingh) August 15, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

एका रुमचं भाडं लाखाच्या जवळ : अहमदाबादच्या रामदेवनगर इथं असलेल्या 'कंट्री मॅरियट' हॉटेलचं वातावरण शहरातील इतर पंचतारांकित हॉटेल्ससारखंच आहे. 'कंट्री मॅरियट' हॉटेलमधील एका खोलीची किंमत 13 आणि 14 ऑक्टोबर रोजी 70,000 रुपये आणि 18 टक्के करासह 82,600 रुपये असेल, असं 'कंट्री मॅरियट' येथे डेस्कवर काम करणाऱ्या जीतनं ईटीव्ही भारतशी फोनवर बोलताना सांगितलं. आयपीएलची टीम 'कंट्री मॅरियट' हॉटेलमध्ये राहायची आणि वर्ल्डकप सामने सुरु होण्यापूर्वी भारत आणि इंग्लंडचे क्रिकेट संघ इथं राहायचे.

भारतीय संघ कुठे राहणार : भारतीय संघ 12 ऑक्टोबरपासून अहमदाबादच्या सॅटेलाइट एक्स्टेंशनमधील 'आयटीसी नर्मदा' हॉटेलमध्ये मुक्कामी राहणार आहे, तिथं एकही खोली उपलब्ध नाही. या हॉटेलमधील सर्व खोल्या बुक आहेत. 'आयटीसी नर्मदा'च्या बुकिंग डेस्कचे रजत दूरध्वनीवरून ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाले की, इथं एका व्यक्तीसाठी २४ तासांसाठी एका खोलीची किंमत ४२ हजार रुपयांपर्यंत आहे. ज्यात नाश्त्याचाही समावेश आहे. मात्र सध्या हॉटेलमध्ये सिंगल रूमही उपलब्ध नसल्याचं सांगितलंय.

सर्व हॉटेल्स फुल : भारत पाकिस्तान सामना अहमदाबादमधील हॉटेल्स व्यवसायिकांसाठी वरदान ठरलंय. शहरातील पंचतारांकितांसह विविध हॉटेल्स आणि गेस्ट हाऊस सध्या हाऊसफुल्ल झाली आहेत. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमची क्षमता 1.10 लाख प्रेक्षकांची आहे. जगाभरातील क्रिकेटप्रेमी पंचतारांकित हॉटेलमध्ये सामना पाहण्याची संधी सोडणार नाहीत असं दिसतंय.

हेही वाचा :

  1. ICC CWC 2023 India vs Pakistan : भारत की पाकिस्तान? कोण जिंकणार 'हाय-व्होल्टेज' सामना? काय आहे आजपर्यंतचा इतिहास, वाचा...
  2. Cricket World Cup २०२३ : विश्वचषकात रोहितची गाडी सुसाट! सर्वाधिक शतक, सर्वाधिक षटकार; जाणून घ्या किती रेकॉर्ड मोडले
  3. Cricket World Cup २०२३ : डेंग्यूनं ग्रस्त शुभमन गिल पाकिस्तानविरुद्ध खेळणार का? जाणून घ्या हेल्थ अपडेट
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.