ETV Bharat / sports

Cricket World Cup २०२३ : विश्वचषकात रोहितची गाडी सुसाट! सर्वाधिक शतक, सर्वाधिक षटकार; जाणून घ्या किती रेकॉर्ड मोडले

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 11, 2023, 8:58 PM IST

Cricket World Cup २०२३ : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानं अफगाणिस्तानविरुद्ध शानदार शतक ठोकलं. या सामन्यात त्यानं अनेक रेकॉर्ड उध्वस्त केले. जाणून घेण्यासाठी वाचा ही बातमी..

Rohit Sharma
Rohit Sharma

नवी दिल्ली Cricket World Cup २०२३ : रेकॉर्ड आणि रोहित शर्मा यांचं नातं जुनं आहे. रोहित जेव्हा-जेव्हा मैदानावर उतरतो, तेव्हा तो कोणता ना कोणता नवा रेकॉर्ड करतो. आता विश्वचषकात अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातही त्यानं अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत.

सर्वात जलद १००० धावा : रोहित शर्मानं बुधवारी आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत १००० धावा पूर्ण केल्या. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्यानं हा टप्पा गाठला. विश्वचषकात १००० धावांचा टप्पा गाठणारा रोहित शर्मा संयुक्तपणे सर्वात जलद खेळाडू बनला आहे. अशी कामगिरी करणारा तो तिसरा आणि सर्वात वेगवान भारतीय ठरला. ३६ वर्षीय रोहित शर्मानं विश्वचषकात केवळ १९ डावांमध्ये १००० धावा पूर्ण केल्या. या आधीचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज एबी डीव्हिलियर्सच्या नावे होता. या दोघांनीही २० डावांमध्ये १००० धावांचा टप्पा गाठला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार : अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मानं आणखी एक विक्रम आपल्या नावे केला. आता तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा खेळाडू बनला आहे. त्यानं वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलचा ५५३ षटकारांचा विक्रम मोडला. रोहित शर्मानं ४७३ डावांमध्ये ५५४ षटकार ठोकले आहेत. तसेच तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद ५५० षटकार मारणारा खेळाडू आहे. यासह सर्वात जलद २००, ४०० आणि ५०० षटकार मारण्याचा विक्रमही त्याच्या नावे आहे.

विश्वचषकात सर्वाधिक शतक : अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मानं एकदिवसीय क्रिकेटमधील ३१ वं शतक ठोकलं. यासह तो विश्वचषकात सर्वाधिक शतक करणारा खेळाडू बनला आहे. त्यानं महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. सचिनच्या नावे विश्वचषकात ६ शतकं आहेत. रोहितनं अफगाणिस्तानविरुद्ध विश्वचषकातील आपलं ७ वं शतक ठोकलं. विशेष म्हणजे, २०१९ च्या विश्वचषकात रोहितनं ५ शतकं ठोकत एकाच आवृत्तीत सर्वाधिक शतकं मारण्याचा विक्रम नोंदवला होता.

विश्वचषकात सर्वाधिक शतक नोंदवणारे खेळाडू :

  1. रोहित शर्मा - ७
  2. सचिन तेंडुलकर - ६
  3. रिकी पॉन्टिंग - ५
  4. कुमार संगकारा - ५

हेही वाचा :

  1. Cricket World Cup २०२३ : डेंग्यूनं ग्रस्त शुभमन गिल पाकिस्तानविरुद्ध खेळणार का? जाणून घ्या हेल्थ अपडेट
  2. Cricket World Cup २०२३ : भारत-पाकिस्तान सामन्यासाठी पीसीबी प्रमुख भारतात येणार
  3. Cricket World Cup 2023 : श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यानंतर बाबर आझमनं काय केलं, हैदराबादच्या ग्राउंड स्टाफला...
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.