ETV Bharat / sports

ICC CWC 2023 India vs Pakistan : भारत की पाकिस्तान? कोण जिंकणार 'हाय-व्होल्टेज' सामना? काय आहे आजपर्यंतचा इतिहास, वाचा...

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 12, 2023, 9:01 AM IST

ICC CWC 2023 India vs Pakistan
ICC CWC 2023 India vs Pakistan

ICC CWC 2023 India vs Pakistan : सध्या भारतात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत आतापर्यंत अनेक रोमांचक सामने झालेत. मात्र 14 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान सामन्याची उत्सूकता सर्व क्रिकेट विश्वाला आहे.

अहमदाबाद ICC CWC 2023 India vs Pakistan : कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यात 14 ऑक्टोबर रोजी येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर 'हाय-व्होल्टेज' सामना होणार आहे. 50 षटकांच्या विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत पाकिस्ताननं भारताविरुद्ध एकही सामना जिंकलेला नाही. पाकिस्तानविरुद्धच्या 50 षटकांच्या विश्वचषक सामन्यांमध्ये भारताचं यश 100 टक्के आहे. भारतानं 50 षटकांच्या विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत पाकिस्तानविरुद्ध एकूण सात सामने खेळले आहेत. सातही सामन्यांमध्ये भारतानं पाकिस्तानचा पराभव केलाय.

आतापर्यंतचा इतिहास काय : सिडनी येथे 1992 च्या एकदिवसीय विश्वचषक सामन्यात भारताचा पहिल्यांदा पाकिस्तानशी सामना झाला. या सामन्यात भारतानं 43 धावांनी विजय मिळवला. त्यानंतर 1996 च्या विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत बेंगळुरू इथं खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा 39 धावांनी पराभव केला. अजय जडेजानं पाकिस्तानी वेगवान गोलंदाज वकार युनूसची केलेली धुलाई आणि आमिर सोहेलला व्यंकटेश प्रसादने बाद केल्यामुळं हा सामना चांगलाच गाजला. त्यानंतर 1999 च्या विश्वचषक सामन्यात भारतानं इंग्लंडमधील मँचेस्टर इथं पाकिस्तानचा 47 धावांनी पराभव केला होता. तसंच 2003 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या सेंच्युरियनमध्ये भारतानं पाकिस्तानचा सहा गडी राखून पराभव केला होता. सचिन तेंडुलकरच्या लढाऊ खेळीमुळे हा सामना भारताला जिंकता आला.

यंदाही विक्रम अबाधित राहणार : 2011 च्या विश्वचषकात भारतानं मोहाली इथं उपांत्य फेरीत पाकिस्तानचा 29 धावांनी पराभव केला होता. 2015 च्या विश्वचषक स्पर्धेत भारतानं ऑस्ट्रेलियातील ऍडिलेड इथं पाकिस्तानवर 76 धावांनी विजय मिळवला होता. 2019 च्या विश्वचषकात मँचेस्टर इथं विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतानं पाकिस्तानचा 89 धावांनी पराभव केला होता. यंदाही रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आपला विक्रम अबाधित ठेवेल अशी प्रेक्षकांची अपेक्षा आहे.

गावसकर पहिले खेळाडू : दरम्यान, सरदार पटेल स्टेडियम म्हणून ओळखल्या जाणार्‍या मोटेरा इथं भारताचे माजी फलंदाज सुनील गावस्कर यांनी पाकिस्तानविरुद्धच्या कसोटीत 10,000 धावा करणारे पहिले खेळाडू होण्याचा मान मिळवला होता. 7 मार्च 1987 हा जागतिक क्रिकेटसाठी ऐतिहासिक दिवस होता. यादिवशी पाकिस्तानचा फिरकीपटू इजाझ फकीच्या ऑफ साइडला कट करून कसोटीत १०,००० धावा करणारे सुनील गावसकर जगातील पहिले क्रिकेटपटू ठरले. तेव्हा इम्रान खान पाकिस्तानचे कर्णधार होते. जेव्हा गावसकरांनी आपल्या डावातील 58वी धाव काढली तेव्हा हा टप्पा गाठला.

हेही वाचा :

  1. Cricket World Cup २०२३ : भारत-पाकिस्तान सामन्यासाठी पीसीबी प्रमुख भारतात येणार
  2. Cricket World Cup 2023 : श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यानंतर बाबर आझमनं काय केलं, हैदराबादच्या ग्राउंड स्टाफला...
  3. Cricket World Cup 2023 : आठच सामन्यात आठ नवे विक्रम; आतापर्यंत कोणकोणते नवीन रेकॉर्ड झालेत, वाचा एका क्लिकवर
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.