ETV Bharat / bharat

Tomorrow Horoscope : 'या' राशींच्या स्त्रियांना माहेर कडून मिळणार आनंदाची बातमी, वाचा, उद्याचे राशीभविष्य

author img

By

Published : Feb 6, 2023, 3:44 PM IST

07 फेब्रुवारी 2023 रोजी जन्मकुंडलीतील उद्याच्या भाग्यशाली राशीची चिन्हे जाणून घ्या. कसा असेल तुमचा आजचा दिवस, कशी राहील नोकरी, प्रेम, विवाह, व्यवसाय अशा आघाड्यांवर ग्रहस्थिती! तुमच्या जोडीदारासोबतचा दिवस कसा जाईल, सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'ई टीव्ही' भारतवर वाचा, उद्याचे राशीभविष्य.

Tomorrow Horoscope
उद्याचे राशीभविष्य

या राशीभविष्यात आपण जाणून घेणार आहोत की, आज कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल, कुठे हात सोडता येतील. आजची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला जाणून घेऊया, तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट फेब्रुवारीच्या दैनिक कुंडलीत उद्याचे राशीभविष्य. 07 फेब्रुवारी 2023 .

मेष राशी : आज चंद्र सिंह राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आपल्या उग्र स्वभावावर संयम ठेवणे हितावह राहील. शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल. कष्टाच्या प्रमाणात यश मिळू शकणार नाही. संततीची काळजी सतावेल. कामाच्या धावपळीमुळे कुटुंबियांना योग्य तितका वेळ आपण देऊ शकणार नाही. विघातक विचार, कृती व नियोजन ह्यापासून दूर राहावे. पोटदुखीचा त्रास संभवतो. शक्यतो आज प्रवास टाळावा. सरकारी कामात यश मिळेल.

वृषभ राशी : आज चंद्र सिंह राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज खंबीर मनोबल व दृढ आत्मविश्वासाने आपली कामे कराल. कामात अपेक्षित यश मिळेल. स्त्रीयांना माहेरहून लाभदायी बातमी मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी वाटेल. सरकारी कामात यश मिळेल. आर्थिक व्यवहार यशस्वी होतील. संततीसाठी खर्च करावा लागेल.

मिथुन राशी : आज चंद्र सिंह राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस नव्या संकल्पना राबविण्याच्या दृष्टीने अनुकूल आहे. सरकार कडून लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. एखाद्या प्रवासाचा बेत आखाल. स्नेही वा शेजार्‍यांशी गैरसमज झाले असल्यास ते दूर होतील. अचानकपणे वैचारिक बदल होतील. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. आर्थिक बाबतीत काळजी घेण्याची गरज भासेल.

कर्क राशी : आज चंद्र सिंह राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज नकारात्मक दृष्टिकोनातून काही व्यवहार होतील. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य राहील. मनात दुःख व असंतोष राहील. डोळ्यांचा त्रास जाणवेल. कौटुंबिक वातावरण अनुकूल राहणार नाही. कुटुंबियांशी गैरसमज होतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळणार नाही. अवैध बाबीं पासून दूर राहावे. आज खर्चाचे प्रमाण वाढेल.

सिंह राशी : आज चंद्र सिंह राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज आपला आत्मविश्वास दुणावेल. कोणतेही काम करण्या विषयी त्वरित निर्णय घेऊ शकाल. वडील व वडीलधार्‍यां कडून लाभ होईल. समाजात मान- प्रतिष्ठा वाढेल. बोलणे - वागणे संयमित ठेवावे लागेल. रागाचे प्रमाण वाढेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.

कन्या राशी : आज चंद्र सिंह राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज एखादा वाद होऊन आपला अहंकार दुखावण्याची शक्यता आहे. शारीरिक थकवा व मानसिक चिंता राहील. मित्र व स्वकीयांशी वैचारिक पातळीवर मतभेद होतील. स्वभावात उग्रपणा व संतापाचे प्रमाण वाढेल. मांगलिक कार्यासाठी खर्च होईल. प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. अचानकपणे खर्च वाढतील. शक्यतो वाद व संघर्ष ह्यापासून दूर राहावे.

तूळ राशी : आज चंद्र सिंह राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. विविध क्षेत्रांतून लाभ झाल्याने आपली प्रसन्नता वाढेल. उत्पन्न वाढेल. मित्रांसाठी खर्च करावा लागेल व त्यांच्याकडून लाभ सुद्धा होईल. प्रवास अथवा सहलीस जाण्यासाठी दिवस अनुकूल आहे. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेता येईल.

वृश्चिक राशी :आज चंद्र सिंह राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कामाच्या ठिकाणी वातावरण आपणास अनुकूल राहील. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. आपली कामे सहजपणे पूर्ण होतील. मान मरातब वाढेल. नोकरीत बढती मिळेल. कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहील. व्यापारासाठी प्रवास करावा लागेल. संततीच्या प्रगतीमुळे आनंदित व्हाल.

धनु राशी : आज चंद्र सिंह राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज प्रकृती यथा तथाच राहील. शारीरिक दृष्टया आळस व अशक्तपणा जाणवेल. मानसिक चिंता व व्याकुळता राहील. व्यवसायात विघ्ने निर्माण होतील. नकारात्मक विचार दूर सारावे लागतील. कोणत्याही कार्याचे नियोजन जपून करावे. वरिष्ठांशी संघर्ष संभवतो. प्रतिस्पर्धी व विरोधकांशी दोन हात करावे लागतील.

मकर राशी : आज चंद्र सिंह राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज अचानकपणे खर्चाचे प्रसंग उदभवतील व त्यामुळे व्यावहारिक किंवा सामाजिक कार्यासाठी बाहेर पडावे लागेल. क्रोध नियंत्रित ठेवावा. सकारात्मक विचारांनी नकारात्मकता दूर करावी लागेल. व्यवसायात अनुकूलता जाणवेल. भागीदारांशी मतभेद संभवतात. सरकारी क्षेत्रांशी संबंधित कामात आपल्या क्षमतेचा योग्य उपयोग कराल.

कुंभ राशी : आज चंद्र सिंह राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज खंबीर मन व दृढ आत्मविश्वासाने आपण प्रत्येक काम कराल. प्रवास - सहलीची शक्यता आहे. स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद व नवी वस्त्र परिधान करण्याचे प्रसंग येतील. भागीदारां कडून लाभ होतील. वाहनसुख मिळेल.

मीन राशी : आज चंद्र सिंह राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. शारीरिक स्वास्थ्य जाणवेल. घरातील वातावरण आनंदी राहील. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. स्वभावातून अती उत्साह व उग्रता काढून टाकणे हितावह होईल. वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. व्यवसायात चांगले सहकार्य मिळेल. स्त्रीयांना माहेरून एखादी चांगली बातमी मिळेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.