ETV Bharat / bharat

Fire Broke : मोहालीत केमिकल फॅक्टरीला भीषण आग, 8 जण गंभीर जखमी

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 27, 2023, 8:08 PM IST

मोहालीतील एका रासायनिक कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत 8 जण गंभीररीत्या भाजले असून, त्यांना उपचारासाठी 6 फेस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. आग लागल्यापासून कारखान्यात सतत स्फोट होत आहेत. अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत.

Fire Broke
Fire Broke

मोहाली : पंजाबमधील मोहाली परिसरातील कुरळी येथील एका रासायनिक कारखान्याला भीषण आग लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात 7 ते 8 जण गंभीर भाजले आहेत. मोहाली, रोपर येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या दोन शहरांतून रुग्णवाहिका, डॉक्टरांचे पथकही घटनास्थळी पोहोचलं आहे. पोलीस अधिकारी, अग्निशमन दलाच्या दोन डझनहून अधिक गाड्या घटनास्थळी आग विझवण्याचे प्रयत्न करीत आहेत.

5 जणांना वाचवण्यात यश : आगीतून आतापर्यंत 5 जणांना वाचवण्यात यश आलं असून 6 जणांना मोहालीतील फेस हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं आहे. सध्या यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. घटनास्थळी दोन रुग्णवाहिका पाठवण्यात आल्याचं घटनास्थळी उपस्थित डॉक्टरांनी सांगितलं. कारखान्याला लागलेली आग भीषण असल्यामुळं रसायनांचा सतत स्फोट होत आहे.

आग विझवण्याचे प्रयत्न : या घटनेचे वव्हिडिओ समोर आले आहे. पहिला व्हिडिओ अगदी जवळून घेण्यात आला आहे. ज्यामध्ये उंच ज्वालाचे लोट उठताना दिसत आहेत. दुसरा व्हिडिओ दूरवरून शूट करण्यात आला आहे, ज्यामध्ये आगीमुळं काळा धूर आकाशात उठताना दिसत आहे. सध्या अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत. आग विझवण्यासाठी अनेक अग्निशमन दलाचे कर्मचारी दोन तासापासून अथक परिश्रम घेत आहेत, मात्र आत्तापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवता आलेलं नाहीय.

भिंत तोडून कारखान्यात घुसण्याचा प्रयत्न : अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी बाहेरून पाण्याची फवारणी करत आहेत. वाढत्या तापमानामुळे आजूबाजूच्या कारखान्यांना आगीचा धोका वाढला आहे. त्यामुळे आता भिंत तोडून आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे वाहन आत पाठवण्याची योजना आखली जात आहे. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास कारखान्यात अचानक स्फोट झाला. त्यामुळं पाच महिला कर्मचारी भाजल्या. जेव्हा स्फोट झाला एकच धावपळ उडाली. यानंतर अग्निशमन दलानं घटनास्थळी पोहोचून आत अडकलेल्या कामगारांना बाहेर काढलं. त्यांना घटनास्थळीच प्राथमिक उपचार करून उपचारासाठी फेज 6 येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं.

हेही वाचा -

  1. Mumbai Fire : इमारतीला लागलेल्या आगीनं खळबळ, 50 ते 60 नागरिकांना काढलं इमारतीमधून बाहेर
  2. Fire In Mumbai : कुर्ला झोपडपट्टी परिसरात भीषण आग, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल
  3. Delhi AIIMS FIRE : दिल्ली एम्स रुग्णालयात भीषण आग, रुग्णांना सुरक्षितपणे बाहेर काढले!
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.