ETV Bharat / bharat

Father's Day 2022 Google Doodle : 'फादर्स डे' निमित्त गुगलच्या डूडलद्वारे शुभेच्छा; का साजरा केला जातो 'हा' दिवस, वाचा सविस्तर

author img

By

Published : Jun 19, 2022, 9:37 AM IST

Updated : Jun 19, 2022, 10:27 AM IST

Father's Day 2022 Googel Doodel
Father's Day 2022 Googel Doodel

'फादर्स डे' दरवर्षी जूनच्या तिसऱ्या रविवारी वडिलांसाठी साजरा केला जातो. सर्च इंजिन गुगलने आज १९ जून २०२२ रोजी फादर्स डे निमित्त एक खास डूडल बनवले ( Father's Day 2022 Google Doodle ) आहे.

दिल्ली - भारतीय परंपरेत, वडिलांच्या प्रतिमेला नेहमीत कठोर मानलं गेलं आहे. हेच कारण आहे की, बहुतेक मुले प्रत्येक गोष्ट आपल्या आईला निकोसंकोचपणे सांगतात. मात्र, वडिलांना सांगण्याची त्यांची हिंमत होत नाही. पण, वडिलांचे मुलांवर प्रेम नसते असे नाही.

मुलं जसजशी मोठी होतात आणि त्यांच्या जबाबदाऱ्या समजून घेतात, तसतसे त्यांना वडिलांचे व्यक्तिमत्त्व आणि प्रतिमा काय असते याची जाणीव होते. वडिलांच्या प्रेमाचा आणि त्यागाचा गौरव करण्यासाठी आज ( 19 जून ) जगातील सर्व देशांमध्ये 'फादर्स डे' साजरा केला जात आहे. वडिलांनासांठी दरवर्षी जूनच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला ( Father's Day 2022 Google Doodle ) जातो. त्यानिमित्ताने गुगलने यंदाही खास डूडल बनवत 'फादर्स डे'च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

काय आहे डूडलमध्ये - 19 जून 2022 चे औचित्य साधत 'फादर्स डे' निमित्त गुगलने हे डूडल बनवले आहे. समस्त वडिलांना समर्पित असलेल्या 'फादर्स डे'च्या या डूडलमध्ये एका लहान मुलाचा हात आणि त्याच्या वडिलांचा हात दिसत आहे. हे दोघे मिळून छानसे चित्र बनवत असल्याचे या डूडलमध्ये दाखवण्यात आलं आहे.

'फादर्स डे'चा इतिहास - 1910 पासून फादर्स डे साजरा करण्यास सुरुवात झाली. वॉशिंग्टनच्या स्पोकेन शहरात राहणाऱ्या सोनोरा डोड या मुलीने फादर्स डेची सुरुवात केली होती, असे मानले जाते. सोनोराच्या आईच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांनी तिला एकट्याने वाढवले. वडिलांनी मुलीला आईसारखे प्रेम दिले आणि तिचे रक्षण केले. सोनोराचे वडील तिला आईची उणीव कधीच जाणवू देत नसत. आईच्या मातृत्वाला वाहिलेला 'मदर्स डे' जेव्हा साजरा करता येतो, तेव्हा वडिलांच्या प्रेमाचा आणि आपुलकीचा गौरव करून 'फादर्स डे'ही साजरा करायला हवा, असा विचार सोनोरा यांनी केला.

'अशी' झाली फादर्स डेची सुरुवात - सोनोराच्या वडिलांचा वाढदिवस जूनमध्ये असायचा. त्यामुळेच त्यांनी जूनमध्ये फादर्स डे साजरा करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. जी मान्य करण्यात आली आणि 19 जून 1910 मध्ये पहिल्यांदा फादर्स डे साजरा करण्यात आला. यानंतर 1916 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनीही फादर्स डे साजरा करण्याचा प्रस्ताव मान्य केला. 1924 मध्ये राष्ट्राध्यक्ष केल्विन कूलिज यांनी फादर्स डे हा राष्ट्रीय कार्यक्रम घोषित केला. नंतर 1966 मध्ये, राष्ट्राध्यक्ष लिंडन जॉन्सन यांनी जूनच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा करण्याची घोषणा केली.

हेही वाचा - Sonia Gandhi : अग्निपथ योजना दिशाहीन, तरुणांकडे दुर्लक्ष करून सरकारने योजना जाहीर केली.. सोनिया गांधींचा हल्लाबोल

Last Updated :Jun 19, 2022, 10:27 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.