ETV Bharat / bharat

CDS जनरल बिपीन रावत यांच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार ... वाचा टॉप न्यूज एका क्लिकवर

author img

By

Published : Dec 10, 2021, 6:43 AM IST

वाचा काल आणि आजच्या महत्त्वाच्या बातम्या. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

  • आज 'या' घडामोडींवर असणार नजर -
  1. सीडीएस जनरल बिपीन रावत (CDS General Bipin Rawat helicopter crash ) व त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्या पार्थीवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
  2. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे आज मानवाधिकार दिनानिमित्त सकाळी 11 वाजता देशाला संबोधित करतील.
  3. उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. ओमायक्रॉनच्या अनुषंगाने ते काही बैठका घेण्याची शक्यता आहे.
  4. आज जागतीक मानवाधिकार दिवस आहे.
  5. आज विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी मतदान होणार आहे. यापूर्वी मुंबईतील दोन जागा, कोल्हापूर व धुळे येथील प्रत्येकी एक, अशा चार जागांवर बिनविरोधत निवड झाली आहे. यामुळे नागपूर व अकोला येथील जागांसाठी ही मतदान होणार आहे.
  6. राज्य सरकारला विविध आघाड्यांवर येत असलेले मोठे अपयश, ओबीसी आरक्षणाबाबत आलेले अपयश, याशिवाय नाशिकमधील कमालीची ढासळलेली कायदा व सुव्यवस्था याच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पक्षातर्फे विशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
  • कालच्या महत्वाच्या बातम्या -
  1. दिल्ली - हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा बुधवारी तामिळनाडूत अपघात ( CDS General Bipin Rawat helicopter crash ) झाला. या अपघातात सीडीएस बिपीन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी व इतर 12 लष्कर अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. बिपीन रावत आणि इतर लष्करी अधिकाऱ्यांच्या अकाली निधनाने सर्वांचे डोळे पाणावले. आज सांयकाळी जनरल बिपीन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्यासह 13 जाणांचे पार्थीव शरीर ( mortal remains of CDS General Bipin Rawat ) पालम विमानतळावर दाखल झाले. सविस्तर वाचा ...
  2. नवी दिल्ली - हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा बुधवारी तामिळनाडूत अपघात ( CDS General Bipin Rawat helicopter crash ) झाला. या अपघातात सीडीएस बिपीन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी व इतर 12 लष्कर अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. बिपीन रावत आणि इतर लष्करी अधिकाऱ्यांच्या अकाली निधनाने सर्वांचे डोळे पाणावले. आज सांयकाळी जनरल बिपीन रावत ( CDS General Bipin Rawat ), त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्यासह 13 जणांचे पार्थीव शरीर पालम विमानतळावर दाखल झाले. विमानतळावर जनरल बिपीन रावत यांच्या पार्थीव शरीराला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी देखील विमानतळावर येऊन रावत यांच्या पार्थीव शरीराला श्रद्धांजली (PM Paid Homage to Bipin Rawat) वाहिली. सविस्तर वाचा ...
  3. नागपूर - गेल्या दोन दिवसांपासून ज्या गोष्टीची राजकीय वर्तुळात चर्चा होती. त्या चर्चेला अखेर विराम मिळालेला असून भाजपामधून आयात केलेले काँग्रेसचे विधान परिषदेचे उमेदवार (MVA Candidate For Legislative Council Election) रवींद्र उर्फ छोटू भोयर यांनी निवडणूक लढण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे मतदानाला काही तास शिल्लक असताना ऐन वेळेवर कॉंग्रेसने अपक्ष उमेदवार असलेल्या मंगेश देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress President Nana Patole) यांनी हा निर्णय घेतला आहे. ऐनवेळी घडलेल्या घटनेमुळे काँग्रेसला किंवा महाविकास आघाडीला 'पंजा' ऐवजी अपक्ष उमेदवाराच्या चिन्हाससमोर मतदान करण्याची वेळ आली आहे. सविस्तर वाचा ...
  4. मुंबई - मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंटेलिजन्स यूनिटला ( AIU ) दोन परदेशी नागरिकांकडे तब्बल 247 कोटींचे ड्रग्ज सापडले आहे. आरोपींकडे तब्बल 35 किलो हेरॉईन होते. याप्रकरणी एआययूने दोन परदेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे. सविस्तर वाचा ...
  5. मुंबई - राज्यात ( Corona Update ) गुरुवारी (दि. 9) दिवसभरात 789 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 585 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा सरासरी दर 97.72 टक्के इतका असून मृत्यूदर 2.17 टक्के इतका आहे. सविस्तर वाचा...
  6. भारताचे सर्वात पहिले सीडीएस, जनरल बिपीन रावत यांचे अपघाती निधन ( CDS General Bipin Rawat helicopter crash ) झाले. हवाई दलाच्या (Air Force) MI-17 V5 हेलिकॉप्टरमधून लष्कराच्या तळावर जात असताना निलगिरीच्या घनदाट जंगलात त्यांचा अपघात झाला. हेलिकॉप्टर लँड होण्यापूर्वी काही मिनिटे आधी हा अपघात झाला. यामध्ये जनरल रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि इतर ११ अधिकारी अशा एकूण १३ जणांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर या अपघातात एक अधिकारी बचावले आहेत. त्यांचे नाव आहे ग्रुप कॅप्टन वरुन सिंह. त्यांचीही मृत्यूशी झुंज सुरू आहे. सविस्तर वाचा ...
  • जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य -
  1. VIDEO : 10 डिसेंबर राशीभविष्य - कसा असेल तुमचा दिवस? जाणून घ्या आजचे राशीभविष्य
  2. 10 डिसेंबर राशीभविष्य : 'या' राशीवाल्यांचे आज विवाह ठरतील; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.