ETV Bharat / bharat

पालम विमानतळ : CDS जनरल बिपीन रावत यांच्यासह सर्व 13 जणांना पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली

author img

By

Published : Dec 9, 2021, 8:08 PM IST

Updated : Dec 9, 2021, 10:02 PM IST

CDS जनरल बिपीन रावत यांच्यासह सर्व 13 जणांचे पार्थीव शरीर पालम विमानतळावर. ( mortal remains of CDS General Bipin Rawat )

mortal remains of CDS General Bipin Rawat
जनरल बिपीन रावत पार्थीव शरीर पालम विमानतळ

दिल्ली - हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा बुधवारी तामिळनाडूत अपघात ( CDS General Bipin Rawat helicopter crash ) झाला. या अपघातात सीडीएस बिपीन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी व इतर 12 लष्कर अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. बिपीन रावत आणि इतर लष्करी अधिकाऱ्यांच्या अकाली निधनाने सर्वांचे डोळे पाणावले. आज सांयकाळी जनरल बिपीन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्यासह 13 जाणांचे पार्थीव शरीर ( mortal remains of CDS General Bipin Rawat ) पालम विमानतळावर दाखल झाले.

विमानतळावर जनरल बिपीन रावत यांच्यासह 13 जणांच्या पार्थीव शरीराला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी देखील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली.

हेही वाचा - Goa Assembly Election 2022 : गोवा काँग्रेस लवकरच उमेदवारांची यादी जाहीर करणार - पी. चिदंबरम

अपघातात निधन झालेल्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत.

1) जनरल बिपीन रावत

2) मधुलिका रावत

3) सीडीएसचे संरक्षण सल्लागार ब्रिगेडियर लखविंदर सिंह लिड्डर

4) लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग

5) विंग कमांडर प्रतीक सिंह चौहान

6) स्क्वाड्रन लीडर कुलदीप सिंह

7) जूनियर वारंट अधिकारी राणा प्रताप दास

8) जूनियर अधिकारी अरक्कल प्रदीप

9) हवालदार सतपाल

10) नायक गुरसेवक सिंह

11) नायक जितेंद्र कुमार

12) लान्स नायक विवेक कुमार

13) लान्स नायक वीर साई तेजा

बिपिन रावत हे देशाचे पहिले CDS होते

बिपिन रावत (Bipin Rawat) हे देशाचे पहिले CDS अधिकारी म्हणजेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ होते. सीडीएसचे काम लष्कर (Army), हवाई दल (Air Force) आणि नौदल (Navy) यांच्यात समन्वय साधणे आहे. संरक्षण मंत्र्यांच्या प्रमुख सल्लागारांपैकी ते एक होते. तिन्ही सैन्यांमध्ये समन्वय साधण्याचे महत्त्वाचे काम बिपीन रावत यांच्याकडे होते.

अवघ्या २० मिनिटांनी हेलिकॉप्टरसोबतचा संपर्क तुटला -

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरचा उड्डाण कालावधी अवघा २७ मिनिटांचा होता. ११ वाजून ४८ मिनिटांनी हेलिकॉप्टरने उड्डाण घेतले. हे हेलिकॉप्टर १२ वाजून १५ मिनिटांनी वेलिंग्टन येथे पोहोचणार होते. मात्र १२ वाजून ८ मिनिटांनी म्हणजेच उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या २० मिनिटांनी हेलिकॉप्टरसोबतचा संपर्क तुटला, दरम्यान, काही स्थानिकांनी जंगलातून धुराचे लोट येताना दिसले. त्याकडे सर्वांनी धाव घेतली. यावेळी त्यांना एक हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याचे दिसले व त्यांनी जखमींना वेलिंग्टनच्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. यावेळी घटनास्थळावर लष्करही मदतीसाठी पोहोचले होते. त्यांनी सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या अपघातात सीडीएस बिपीन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी व इतर 12 लष्कर अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. तर, ग्रुप कॅप्टन वरुण सिंग हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

पूर्ण लष्करी सन्मानाने सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्यावर होणार अंत्यसंस्कार -

सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्यावर पूर्ण लष्करी सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. तसेच, लष्करी जवानांचे अंतिम संस्कार योग्य लष्करी सन्मानाने केले जातील, अशी माहितीही राजनाथ सिंह यांनी तामिळनाडूतील लष्करी हेलिकॉप्टर दुर्घटनेवर लोकसभेत दिलेल्या निवेदनात दिली आहे.

एअर मार्शल मानवेंद्र सिंग करणार त्रि-सेवा चौकशी -

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिलेल्या निवेदनात सांगितले की, भारतीय वायुसेनेने (IAF) लष्करी हेलिकॉप्टर अपघाताची त्रि-सेवा चौकशीचे ( Indian Air Force ordered tri-service inquiry ) आदेश दिले आहेत. या तपासाचे नेतृत्व एअर मार्शल मानवेंद्र सिंग करणार आहेत. चौकशी पथक कालच वेलिंग्टनला पोहोचले आणि तपास सुरू केला आहे, असे ते म्हणाले.

हेही वाचा - OBC Reservation : सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकार सादर करणार प्रतिज्ञापत्र, उपयोग होईल?

Last Updated : Dec 9, 2021, 10:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.