महाराष्ट्र

maharashtra

अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार का? पाहा काय म्हणाले रोहित पवार - Lok Sabha Election 2024

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 18, 2024, 9:35 PM IST

पुणे Lok Sabha Election 2024 : राष्ट्रवादी फुटीनंतर अजित पवार ( Ajit Pawar) तसंच शरद पवार (Sharad Pawar) पक्षाचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे. लोकसभेच्या निवडणुकीत बारामतीतून सुळे विरुद्ध पवार अशी लढत होत असून आता मूळचे पवार की, बाहेरचे पवार अशी थेट टीका होताना दिसत आहे. अशातच सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी दोन दिवसांपूर्वी निवडणुकीनंतर पवार कुटुंबातील संबंध सुधारताना दिसेल असं सांगितलं होतं. यावर रोहित पवार यांनी आपलं मत व्यक्त केलं. अजित पवार यांच्याकडून शरद पवार यांच्यावर खूपच टीका झाल्याचं  रोहित पवार यांनी म्हटलंय. एकूणच अजित पवार यांनी केलेलं वक्तव्य तसंच पवार कुटुंब एकत्र येतील का? यावर रोहित पवार यांच्याशी केलेली खास बातचीत पाहूयात.

ABOUT THE AUTHOR

...view details