महाराष्ट्र

maharashtra

रवींद्र धंगेकर एक लाख मतांनी निवडून येणार; विजय वडेट्टीवार यांचा विश्वास - Lok Sabha Election 2024

By ETV Bharat Marathi Team

Published : May 5, 2024, 9:13 PM IST

विजय वडेट्टीवार आणि रवींद्र धंगेकर (Maharashtra Desk)

पुणे Lok Sabha Election 2024 : यंदाच्या या लोकसभेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची जादू ही चालत नाही. राज्यात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात झालेल्या मतदानात महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणावर यश मिळणार आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या 38 हून अधिक जागा या निवडून येणार आहे. पुण्यात तर सामान्य नागरिक हा काँग्रेस उमेदवाराच्या मागे उभा असून काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर हे कमीत कमी एक लाख मतांनी जिंकून येतील असा विश्वास, काँगेस नेते विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे. पुण्यात काँग्रेस भवन येथे काँगेस नेते तसेच राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, यावेळी त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. 

ABOUT THE AUTHOR

...view details