महाराष्ट्र

maharashtra

जगभरात मेटाची सेवा ठप्प, एक्सवर मीम्सचा धुमाकूळ; काय होतात परिणाम

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 5, 2024, 11:03 PM IST

फाईल फोटो
फाईल फोटो

Facebook, Instagram Down : फेसबुक डाऊन झाल्याने वापरकर्ते नाराज झाले आहेत. याबद्दलची नाराजी अनेकांनी ट्विटरवर व्यक्त केली. काही वेळातच फेसबुक चालू झालं. मात्र, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर याचा परिणाम झाल्याचं दिसलं. सध्या हे माध्यम डाऊन चालत आहेत.

नवी दिल्ली :Facebook, Instagram Down : सध्या फेसबुक डाऊन आहे. काही मिनिटांमध्ये सेवा पूर्ववत होईल, असं नोटिफिकेशन फेसबुकवर लॉग इन करताच दिसू लागतो. या नोटिफिकेशनचा स्क्रीनशॉट अनेकांनी ट्विटरवर शेअर केला आहे. अनेकांनी यावरुन फेसबुकसंबंधी ट्वीटरवर मीम्स बनवले आहेत. दरम्यान, यापूर्वीदेखील जेव्हा-जेव्हा फेसबूकची सेवा ठप्प झाली होती तेव्हादेखील मेटाने कधी सेवा ठप्प होण्याचं कारण स्पष्ट केलं नव्हतं. दरम्यान, Downdetector च्या रिपोर्टनुसार भारतीय वेळेनुसार रात्री 9.10 वाजल्यापासून देशात मेटाची सेवा ठप्प आहे.

मेटाच्या सेवा हॅक झाल्याचं लक्षण : फेसबूक डाऊन झाल्याने काही युजर्सना केंब्रिज अ‍ॅनालिटिका फेबसूक डेटा लीक प्रकरणाची आठवण झाली. त्यावेळीदेखील युजर्सचे अकाऊंट्स आपोआप लॉग आऊट होत होते. मेटाच्या टीमने काही तासांनंतर मेटाच्या सेवा सुरळीत केल्या. परंतु, काही दिवसांनी फेसबूक डाऊन काळात कोट्यवधी युजर्सचा डेटा लीक झाल्याची माहिती समोर आली होती. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते युजर्सचे अकाऊंट्स आपोआप लॉग आऊट होणं हे मेटाच्या सेवा हॅक झाल्याचं दर्शवत आहेत.

मोठ्या प्रमाणात मीम्स : आज मंगळवार रात्री 9 वाजल्यापासून फेसबुक (Facebook) आणि इन्स्टाग्राम (Instagram) पूर्णपणे डाऊन झालंय. नेटकऱ्यांचं फेसबुक (Facebook) लॉग आऊट झालं असून लॉग इन करताना अडचणी येत आहेत. नेटकऱ्यांसाठी फेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद झाल्याने अनेक ठिकाणी मीम्स बनवले आहेत मात्र, असं झालं तर काय कराव?

फेसबुक बंद झाल्यावर काय कराव ? :फेसबुक खाते बंद होणं ही एक सामान्य गोष्ट आहे. पण जेव्हा ते खूप प्रयत्न करून पण चालू होत नसेल तर तुम्हाला फेसबुक ची टीम शी संपर्क करावा लागतो. (Facebook Help Center | Facebook)या लिंक वर क्लिक करा. त्या नंतर उजव्या बाजूला (SUPPORT INBOX) ला जावा. अर्थात तुमचं अकाऊंट नसेल तर मित्राचंही वापरू शकता.

हेही वाचा :

1फेसबुक आणि इन्स्टाग्राम डाऊन; नेटकरी चिंतेत

2अमित शाहांची जोरदार फटकेबाजी; शरद पवारांना दिलं ओपन चॅलेंज, राहुल गांधींवरही हल्लाबोल

3"पक्ष आणि पवार कुटुंबात फूट नाही"; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?

ABOUT THE AUTHOR

...view details