ETV Bharat / technology

तुमचा फोन हरवला? काळजी करू नका; तुम्ही तुमचा हरवलेला फोन ट्रॅक करू शकता - Block Stolen Phone

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 21, 2024, 10:09 PM IST

Block Stolen Phone
मोबाईल फोन

Block Stolen Phone : तुमचा फोन हरवला? कोणीतरी चोरी केल्याचा संशय आहे? काळजी करू नका. 'संचार साथीच्या' (Sanchar Saathi) मदतीनं तुम्ही तुमचा हरवलेला फोन ट्रॅक करू शकता. कसे ते पाहूया.

Block Stolen Phone : मोबाईल फोन हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनला आहे. यामध्ये आम्ही केवळ संपर्क क्रमांकच नाही तर अतिशय संवेदनशील माहिती (डेटा) सेव्ह करतो. आपला मोबाईल कोणी चोरला किंवा चुकून तो हरवला तर आम्हाला खूप त्रास सहन करावा लागतो. म्हणूनच अशा समस्यांना आळा घालण्यासाठी 'संचार साथी' (Sanchar Saathi) एक सोपा उपाय शोधला आहे.

'CEIR' म्हणजे काय : तुमचा फोन हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास, 'सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर' (CEIR) तो त्वरित ब्लॉक करू शकता. इतकेच नाही तर तुमचा फोन रिकव्हर झाला तर तुम्ही तो अनलॉक करून वापरू शकता. यासाठी फोन हरवलेल्या व्यक्तींना IMEI आणि इतर तपशील देऊन संचार साथी पोर्टलवर तक्रार नोंदवता येईल. आतापर्यंत देशभरातील पीडितांचं 15,43,666 हरवलेले फोन ब्लॉक करण्यात आले आहेत. त्यापैकी 8,47,140 फोन व्यक्तींना परत करण्यात आला आहेत.

सायबर गुन्हेगारांची तपासणी : आज सायबर गुन्ह्यांमध्ये झपाट्यानं वाढ होत आहे. सायबर गुन्हेगार हे लिंकद्वारे मालवेअरला पाठवून, बँक अधिकाऱ्यांच्या नावाखाली फोन कॉल करून, ओटीपी जाणून घेऊन अनेक गुन्हे करत असतात. त्यामुळंच सरकार सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक उपाययोजना करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून दूरसंचार विभागाच्या वतीनं 'संचार साथी' हे पोर्टल उपलब्ध करून देण्यात आलंय. त्यामुळं कोणताही पीडित व्यक्तीला https://sancharsaathi.gov.in या पोर्टलवर जाऊन सेल फोन आणि सिमकार्डशी संबंधित माहिती जाणून घेऊ शकतो. शिवाय सायबर गुन्ह्यांबाबत जागरूकता वाढवता येईल.

फसवणुकीची तक्रार : सायबर गुन्हेगार कॉल, एसएमएस, व्हॉट्सॲपद्वारे तुमची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असल्यास तुम्ही 'चक्षु' पोर्टल'वर तत्काळ तक्रार नोंदवू शकता. बँक खाते, पेमेंट वॉलेट, सिम, गॅस कनेक्शन, वीज कनेक्शन, केवायसी अपडेट, एक्सपायरी, डिॲक्टिव्हेशन, तोतयागिरी (सरकारी अधिकाऱ्यांची तोतयागिरी), सेक्सटोर्शन यांसारख्या फसवणुकीची तक्रार चक्षुमध्ये केली जाऊ शकते.

तुमचा मोबाईल जाणून घ्या : कमी किंमतीत सेकंड हँड मोबाईल विकत घेऊन भोळ्याभाबड्या लोकांची कोंडी होत असते. यासंदर्भात, तुमच्या मोबाईलला (KYM) हे वैशिष्ट्य उपलब्ध करून देण्यात आले की, मोबाइल खरेदी करण्यापूर्वी फोनबद्दल जाणून घ्या. कोणत्याही फोनची वैधता त्याच्या IMEI क्रमांकावरून कळू शकते. फोनवर *#06# डायल करून IMEI नंबर मिळवला जातो. ते पोर्टलमध्ये प्रविष्ट करा. तुम्हाला तो फोन 'ब्लॅकलिस्टेड', 'डुप्लिकेट', 'आधीच वापरात आहे, असं आढळल्यास तो खरेदी न करणं चांगलं.

तुमचे मोबाईल कनेक्शन जाणून घ्या : सायबर गुन्हेगार इतरांच्या नावे सिमकार्ड घेऊन फसवणूक करत आहेत. त्यामुळं अशा गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी DVT नं टेलिकॉम ॲनालिटिक्स फॉर फ्रॉड मॅनेजमेंट अँड कन्झ्युमर प्रोटेक्शन (Tafcop) वैशिष्ट्य सादर केलं आहे. याद्वारे नकळत कोणी आपल्या नावानं सिमकार्ड वापरत आहे का? हे जाणून घेणं खूप सोपं आहे.

तुमच्याकडं अज्ञात सिमकार्ड आहे का? : प्रथम Tafcop उघडा आणि मोबाइल नंबर प्रविष्ट करा. तुम्हाला लगेच OTP मिळेल. जर तुम्ही तो ओटीपी टाकला आणि लॉगिन केलं तर तुमच्या नावावर किती सिमकार्ड जारी केले आहेत हे तुम्हाला समजेल. तुमच्याकडं अज्ञात सिमकार्ड असल्यास, तुम्ही त्यांची तक्रार करू शकता आणि त्यांना ब्लॉक करू शकता. हे वैशिष्ट्य उपलब्ध झाल्यानंतर, देशभरातून आतापर्यंत 65,23,541 विनंत्या प्राप्त झाल्या आहेत, त्यापैकी 55,57,507 प्रकरणांचं निराकरण करण्यात आलं आहे.

फसव्या कॉलची तक्रार : सायबर गुन्हेगार परदेशातून फोन करून फसवणूक करत असल्याच्या घटना आपण अनेकदा पाहतो. वास्तविक, हे गुन्हेगार परदेशातून फोन करत असले तरी तो क्रमांक भारतीय कोडचा आहे. परंतु सायबर गुन्हेगार कोणत्या भाषेत बोलतात, त्यानुसार त्यांना परदेशी म्हणून ओळखणं सोपं जातं. 'रिपोर्ट इनकमिंग इंटरनॅशनल कॉल विथ इंडियन नंबर (REQUIN)' या फीचरद्वारे अशा फसव्या कॉलची तक्रार केली जाऊ शकते. यासह, DVOT संबंधित क्रमांकांवर लक्ष ठेवेल.

हेही वाचा -

  1. AIIMS नं स्प्रिंग असिस्टेड क्रॅनियोप्लास्टी तंत्राचा वापर करून दिला बाळाच्या डोक्याला नवा आकार - AIIMS
  2. फेसबुकसह इन्स्टाग्राम बंद झाल्यानं वापरकर्त्यांचा संताप, मेटाच्या प्रवक्त्याकडून एक्स सोशल मीडियावर दिलगिरी
  3. Redmi Note 13 लॉंच; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.