महाराष्ट्र

maharashtra

देवाने डोळे दिले पण नजर दिली डॉक्टरांनी; दोन वर्षांच्या मुलीवर झाली यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 13, 2024, 10:17 AM IST

Updated : Feb 13, 2024, 11:43 AM IST

Two Year Old Gir Cataract Surgery : सरकारी रुग्णालयात उपचारासाठी जाण्यासाठी अनेक लोक कचरतात. त्यातही अखेरची पायरी म्हणून देखील सरकारी रुग्णालयाकडं पहिलं जातं. मात्र, याच सरकारी रुग्णालयात दोन वर्षांच्या मुलीवर यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया पार पडलीय.

Cataract Treatment
मोतीबिंदू शस्त्रक्रिया

प्रतिक्रिया देताना नेत्रतज्ञ डॉ. शुभांगी अंबाडेकर

ठाणे Two Year Old Gir Cataract Surgery : आपल्याला फक्त उजेड दिसला आणि बाकी काहीच दिसलं नाही तर? ही कल्पनाच किती भयावह आहे. परंतु ठाण्यातील सरकारी रुग्णालयात डॉक्टरांनी अशीच एक अवघड शस्त्रक्रिया करून दोन वर्षाच्या चिमुरडीला नवीन दृष्टी मिळवून दिलीय. जन्मताच दोन्ही डोळ्यात मोतीबिंदू असलेल्या मुलीला डॉक्टरांनी आपल्या अथक परिश्रमाने जग पाहण्याची दृष्टी दिलीय. अत्यंत कठीण असलेले हे आव्हान सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी स्वीकारलं आणि कठीण शस्त्रक्रिया यशस्वी करून दाखवली.



जन्मत:च होता मोतीबिंदू : थोडा वेळ डोळे बंद करून चालण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा तेव्हाच हे किती कठीण आहे, हे आपल्या लक्षात येईल. परंतु अशी अनेक मुले आहेत ज्यांना जन्मत:च दृष्टिहीनतेचा शाप मिळालेला असतो. अशीच एक दोन वर्षांची चिमुरडी आपल्या डोळ्यांनी फक्त उजेड पाहून आणि आवाज ऐकून खडतर जीवन जगत होती. नाशिक इगतपुरी येथील मुलीच्या दोन्ही डोळ्यांत जन्मत:च मोतीबिंदू होता. त्यामुळं उजेड आणि आवाजावरून ती आपली कामे करत होती. नाशिक शहरामध्ये केलेल्या तपासण्यावरून तिला मोतीबिंदू असल्याचं स्पष्ट झालं आणि तिच्या पालकांनी थेट ठाण्याचे सरकारी रुग्णालय गाठलं.

मुलीच्या दृष्टीमध्ये झाला अमुलाग्र बदल : ठाणे सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी तिच्या सर्व तपासण्या करून तिला रुग्णालयात दाखल करून घेतलं. थोडीशी कुपोषित असलेल्या या मुलीला डॉक्टरांनी चांगला खुराक देऊन सुदृढ बनवलं. अत्यंत किचकट असलेली शस्त्रक्रिया डॉक्टरांनी पार पाडली. सरकारी रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्र तज्ञ डॉ. शुभांगी अंबाडेकर आणि त्यांच्या टीमने हे कठीण आव्हान यशस्वीरित्या पार केलं. ऑपरेशननंतर या मुलीच्या दृष्टीमध्ये अमुलाग्र बदल झाला. आता ती मोबाईलवर गेम खेळू लागली आहे. फक्त उजेड आणि आवाज ऐकून धावणारी मुलगी आज स्वतःच्या डोळ्यांनी जग पाहू लागली आहे.


हेही वाचा -

  1. Cataract treatment in monsoon : पावसाळ्याच्या दिवसात मोतीबिंदू शस्त्रक्रिया करावी की नाही ? जाणून घ्या उपाय...
  2. World Glaucoma Day २०२३ : भारतातील 12 दशलक्ष नागरिकांची काचबिंदूने गेली दृष्टी, जाणून घ्या काय आहे हा आजार ?
  3. Lion Riyaz Eye Operation : सिंहाला झाला मोतीबिंदू! आता तज्ज्ञ डॉक्टरांकडून होणार ऑपरेशन!
Last Updated : Feb 13, 2024, 11:43 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details