ETV Bharat / sukhibhava

World Glaucoma Day २०२३ : भारतातील 12 दशलक्ष नागरिकांची काचबिंदूने गेली दृष्टी, जाणून घ्या काय आहे हा आजार ?

author img

By

Published : Mar 11, 2023, 2:12 PM IST

जगातील सर्वाधिक नागरिकांची दृष्टी मोतीबिंदूने जाते. मात्र त्यानंतर काचबिंदू हा आजारदेखील नागरिकांच्या दृष्टीवर हल्ला करत आहेत. भारतात तब्बल १२ दशलक्ष नागरिकांची दृष्टी काचबिंदूने गेली आहे. त्यामुळे मोतीबिंदूनंतर काचबिंदू हा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा आजार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

World Glaucoma Day २०२३
संग्रहित छायाचित्र

हैदराबाद : जगभरातील अनेक नागरिकांना मोतीबिंदूने ग्रासल्याने त्यांची दृष्टी गेली आहे. त्यामुळे मोतीबिंदू हा ज्येष्ठ नागरिकांची दृष्टी गमावतो, याबाबत सगळ्यांना माहिती आहे. मात्र काचबिंदूनेही जगभरातील 4.5 दशलक्ष नागरिकांची दृष्टी गमावण्यास कारणीभूत आहे. तर भारतातील तब्बल १२ दशलक्ष नागरिकांची दृष्टी काचबिंदूने दृष्टी गेल्याची धक्कादायक आकडेवारी उघड झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये याबाबत जनजागृती करण्यासाठी १२ मार्च हा जागतिक काचबिंदू दिन किवा ग्लुकोमा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

द वर्ल्ड इज ब्राइट, प्रोटेक्ट युअर व्हिजन : नागरिकांमध्ये ग्लुकोमाबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 12 मार्चला जागतिक काचबिंदू दिन साजरा करण्यात येतो. तर 12 ते 18 मार्च या कालावधीत जगभरातील नागरिकांमध्ये काचबिंदूसारख्या गंभीर नेत्ररोगाबद्दल जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने जागतिक काचबिंदू सप्ताहाचे आयोजन केले जाते. त्यासाठी दरवर्षी वेगळी थीम घेऊन त्यावर जनजागृती करण्यात येते. यावर्षी द वर्ल्ड इज ब्राइट, प्रोटेक्ट युअर व्हिजन अशी थीम गेऊन जागतिक ग्लुकोमा दिवस किवा काचबिंदू दिन साजरा करण्यात येत आहे.

काय आहे काचबिंदू आजार : काचबिंदू किंवा काळा मोतीबिंदू हा डोळ्यांचा एक गंभीर आजार आहे. त्यावर योग्य वेळी उपचार न केल्यास व्यक्तीची दृष्टी कमी होण्याचा धोका असतो. काचबिंदूबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी जागतिक काचबिंदू असोसिएशन आणि जागतिक काचबिंदू रुग्ण नेटवर्क संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी 12 मार्चला जागतिक काचबिंदू दिन आयोजित केला जातो. काचबिंदू हा सामान्यतः काळा मोतीबिंदू म्हणून ओळखला जातो. डोळ्यांच्या ऑप्टिक मज्जातंतूच्या नुकसानाशी संबंधित काही समस्या काचबिंदूच्या श्रेणीमध्ये गणल्या जातात. काचबिंदूला एकापेक्षा जास्त रोग किंवा ऑप्टिक नर्व्हच्या नुकसानाचा गट म्हणतात. वेळेवर तपासणी आणि उपचार न केल्यास यामुळे दृष्टीदोष होऊ शकते. या काचबिंदूचे तीन प्रकार असून यात ओपन-अँगल ग्लॉकोमा, अँगल-क्लोजर ग्लॉकोमा आणि नॉर्मल-टेन्शन ग्लॉकोमा यांचा समावेश आहे.

ज्येष्ठांना होतो काचबिंदू : ज्येष्ठ नागरिकांना काचबिंदूच्या आजाराने ग्रासले जाते. मात्र आता तरुणांनाही काचबिंदू होत असल्याचे दिसून येते. मात्र तरुणांमध्ये काचबिंदू तुलनेने कमी प्रमाणात दिसून येतो. काचबिंदूसाठी केवळ वृद्धापकाळच नाही तर इतरही अनेक कारणे असू शकतात. यामध्ये मधुमेह आणि उच्च रक्तदाबाने ग्रस्त रुग्णांना काचबिंदूचा धोका खूप जास्त असतो. याशिवाय कुटुंबात काचबिंदू आनुवंशिकता असल्यासही काचबिंदू होऊ शकतो. डोळ्यांना दुखापत झाल्यास, स्टेरॉइड्स किंवा इतर औषधांचा दीर्घकाळ वापर यामुळेही काचबिंदूचा धोका वाढत असल्याचे दिसून येते.

भारतात 12 दशलक्ष नागरिकांना काचबिंदूने ग्रासले : काचबिंदू हे जगभरात अंधत्वाचे दुसरे सर्वात मोठे कारण असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार भारतात 12 दशलक्ष नागरिकांना काचबिंदूने ग्रासले आहे. तर जागतिक स्तरावर 4.5 दशलक्ष नागरिक या आजारामुळे अंधत्वाचे बळी ठरले आहेत. काचबिंदूने ग्रस्त नागरिकांना या आजाराची माहिती नसल्याने ही चिंतेची बाब असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांना योग्य वेळी उपचार मिळत नसल्याने त्यांची दृष्टी हळूहळू कमी होते. गेल्या 10 वर्षांत काचबिंदूच्या प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मधुमेह आणि उच्च रक्तदाब आदी आजाराने काचबिंदूच्या रुग्णात वाढ झाल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. याशिवाय मोबाइल, टीव्ही आणि लॅपटॉपवर नागरिकांचा वाढता स्क्रीन टाईम हेही काचबिंदूच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याचे एक प्रमुख कारण मानले जाते असेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

काय घ्यावी काळजी :

  • सुरुवातीच्या टप्प्यात काचबिंदूची लक्षणे आढळून येत नाहीत. अशा परिस्थितीत उपचारास विलंब होतो. मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा काचबिंदूचा धोका वाढवणाऱ्या समस्या आहेत, त्यांनी नियमित तपासणी करून घ्यावी असा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येतो.
  • जीवनशैली आणि आहाराची काळजी घ्या. आहारात अधिकाधिक हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा.
  • संगणक, मोबाईल किंवा टीव्हीसमोर जास्त वेळ बसणे टाळा.
  • 40 वर्षांनंतर दर 2 वर्षांनी एकदा डोळ्यांची तपासणी करा.
  • नियमित व्यायाम करा आणि वजन नियंत्रणात ठेवा.
  • डोळ्यांच्या संरक्षणाची काळजी घ्या, उन्हात बाहेर जाताना चांगला सनग्लास वापरा.
  • डोळ्यांच्या स्वच्छतेची काळजी घ्या, रोज स्वच्छ पाण्याने डोळे धुवावेत.
  • डोळ्यात जळजळ किंवा वेदना झाल्यास किंवा सतत डोकेदुखीच्या तक्रारी असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा.

हेही वाचा - Adenovirus Cases : या राज्यात एडेनोव्हायरसचा संसर्ग आहे सर्वाधिक, जाणून घ्या काय आहेत लक्षणे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.