महाराष्ट्र

maharashtra

ज्यांना अटक होण्यापासून वाचवलं तोच काँग्रेस नेता विरोधात - नितीन गडकरी - Lok Sabha Election 2024

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 16, 2024, 10:32 PM IST

Lok Sabha Election 2024 : काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते त्यांच्या कामासाठी माझ्याकडं आले, पण तेच आज माझ्या विरोधात प्रचार करत आहेत. एका काँग्रेस कार्यकर्त्याला मी तुरुंगात जाण्यापासून वाचवलं, मात्र तोच कार्यकर्ता आज माझ्या विरोधात प्रचार करत असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय. ते आज नागपुरात बोलत होते.

Nitin Gadkari
नितीन गडकरी

नितीन गडकरी यांची पत्रकार परिषद

नागपूर Lok Sabha Election 2024 : मी कधी जात, धर्म, पंथ, पक्ष बघत नाही. सर्वांचं काम करतो, म्हणून सर्वपक्षीय कार्यकर्ते, नेते माझ्याकडं येतात. काँग्रेसच्या एका नेत्याला अटकेपासून संरक्षण मी दिलं होतं. तो नेता आज माझ्या विरोधातील प्रचाराला सर्वात पुढं दिसत असल्याची खंत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बोलून दाखवली आहे. मात्र, यावर माझा कोणताही आक्षेप नसल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. ते आज नागपुरात बोलत होते. नितीन गडकरी यांच्या वक्तव्यानंतर तो काँग्रेस नेता कोण यासंदर्भात चर्चा सुरू झाली आहे.

देशातील पहिल्या पाच शहरांमध्ये नागपूरचा समावेश होणार :नागपूर शहरातील पायाभूत सुविधांना अधिक सक्षम करून शहराला शिक्षण, पर्यटन, उद्योगाच्या क्षेत्रात संपूर्ण देशभरात नावलौकिक मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. तसंच देशातील पहिल्या पाच शहरांमध्ये नागपूरचा समावेश होईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज व्यक्त केला आहे.

दहा वर्षांत 1 लाख कोटींची कामे झाली : नागपूर शहरात विविध ठिकाणी फूड झोन तसंच फुटाळा येथे २५ रेस्टॉरेन्ट, हॉकर्स झोन, ऑरेंज सिस्टी स्ट्रीटवर फ्रुट, व्हेजिटेबल झोन, वर्धा रोडवर सेंद्रीय धान्य, भाजी बाजार हे प्रकल्प होणार आहेत. याशिवाय होलसेल किराणा मार्केटसाठी कळमना परिसरात जागा दिली असून त्याचंही बांधकाम सुरू झालं आहे, अशी माहिती गडकरी यांनी यावेळी दिली. 19 कोटी रुपये खर्चून महाल येथील कल्याणेश्वर मंदिराचं कॉम्प्लेक्स 1 हजार 200 कोटी रुपये खर्चून सिंदी येथे लॉजिस्टीक्स पार्क, शहरात 4 ठिकाणी ट्रक टर्मिनल देखील होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शहराचा सर्वांगीण विकास होत असून गेल्या दहा वर्षांत 1 लाख कोटींची कामं झाली आहेत. काही कामं सुरु आहेत, तर काही प्रगतीपथावर आहेत. नागपूर शहरासाठी आगामी पाच वर्षासाठी नव्या महत्वाकांक्षी योजना आखल्या असून, त्या पूर्ण झाल्यानंतर नागपूर शहर नवं स्मार्ट शहर म्हणून विकसित होणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

68 हजार युवकांना रोजगार मिळाला : मिहानमध्ये आतापर्यंत 86 हजार युवकांना रोजगार मिळाला असून यात विविध कंपन्या गुंतवणूक करीत आहेत. डिसेंबरपर्यंत हा आकडा एक लाखावर जाईल, असंही गडकरी म्हणाले. बांगलादेश वस्तीच्या धर्तीवर शहरातील सर्व झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना मालकी हक्काचे पट्टे देण्याचा प्रयत्न असेल, असं गडकरी यांनी सांगितलं. सध्या ज्येष्ठांसाठी 70 ते 80 बगीचे विकसित करण्यात येत आहेत. त्यांची संख्या 100 पर्यंत नेण्यात येईल. औद्योगिक क्षेत्रातील रोजगार वाढीसाठी शैक्षणिक संस्था, उद्योजक यांच्या समन्वयातून नवी कौशल्य विकास केंद्रे स्थापन करण्यात येतील, असंही त्यांनी सांगितलं. अजनी येथे ‘युरोपियन स्क्वेअर’ विकसित करण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले.


असा आहे वचननामा : तीन रेल्वे स्थानकांचा विकास, 25 लाख संत्र्यांच्या झाडांची लागवड, एम्प्रेस मिलच्या जागेवर टेक्सटाइल मार्केट, रिंग रोडवर ट्रॉली बस, पोलीस क्वार्टर्सचा विकास, मेयो ते लकडगंज या मार्गावर सहा मार्केट्स या भविष्यातील संकल्पांचाही गडकरी यांनी वचननाम्याच्या निमित्तानं उल्लेख केला.

हे वाचलंत का :

  1. महाराष्ट्रातून दोन छत्रपतींचे वंशज लोकसभा निवडणुकीच्या मैदानात; राजघराण्यांना राजकीय पक्ष का करतात जवळ? - Lok Sabha Election 2024
  2. राज ठाकरेंनी उष्णतेच्या लाटेवरुन हवामान विभागाला झापलं; काय म्हणाले नेमकं? - Raj Thackeray on Weather Department
  3. पुण्याचं व्हिजन मांडत असताना मोहोळ आणि धंगेकर यांच्यात जुंपली; शेवटी वसंत मोरेंनी घेतला 'मनसे'चा सहारा - Lok Sabha Election 2024

ABOUT THE AUTHOR

...view details