महाराष्ट्र

maharashtra

अमरावतीच्या ईव्हीएम स्ट्रॉंग रूमला पोलिसांचा मोठा बंदोबस्त - EVM machine

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 28, 2024, 3:41 PM IST

EVM Strong Room : अमरावती लोकसभा मतदारसंघात शुक्रवारी (26 एप्रिल) मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सर्व 1983 मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन्स अमरावती शहरातील विद्यापीठ मार्गावर असणाऱ्या लोकशाही भवन येथील स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. ईव्हीएम मशीन असणाऱ्या स्ट्रॉंग रूमला चार जूनपर्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलीय.

Lok Sabha Election 2024 strict Police Security for EVM strong room in Amravati
अमरावतीच्या ईव्हीएम स्ट्रॉंग रूमला पोलिसांचा मोठा बंदोबस्त

अमरावतीत ईव्हीएम स्ट्रॉंग रूमला कडेकोट सुरक्षा

अमरावती EVM Strong Room :लोकसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर सर्व मतदान केंद्रावरून ईव्हीएम मशीन अमरावती शहरातील लोकशाही भवन या स्ट्रॉंग रूम येथे आणण्यात आल्या आहेत. मेळघाटातील अतिदुर्गम भागात असणाऱ्या मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन्स शनिवारी (27 एप्रिल) रात्री उशिरापर्यंत स्ट्रॉंग रूमवर पोहोचल्या. या स्ट्रॉंग रुमला तीन टप्प्यात सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली. लोकशाही भवनाच्या पहिल्या गेटवर महाराष्ट्र पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. तर दुसऱ्या गेटवर एसआरपीएफची तुकडी सज्ज असून तिसऱ्या गेटवर केंद्रीय सुरक्षा बलाच्या जवानांचा पहारा आहे. यासोबतच ईव्हीएम मशीन असणाऱ्या स्ट्रॉंग रूम परिसरात उपविभागीय अधिकारी तहसीलदार दर्जाचे दोन अधिकारी रोज भेट देणार आहेत.

105 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर : लोकशाही भवन या स्ट्रॉंग रूममध्ये असणाऱ्या ईव्हीएम वर नजर ठेवण्यासाठी एकूण 85 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. यासोबतच लोकशाही भवन परिसरात 23 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. एकूण 105 सीसीटीव्ही कॅमेरे स्ट्रॉंग रूम परिसरात लावण्यात आले आहेत.

4 जूनपर्यंत कडेकोट बंदोबस्त : अमरावती, बडनेरा, दर्यापूर, तिवसा, अचलपूर आणि मेळघाट या सहाही विधानसभा मतदारसंघात असणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या 1883 मतदान केंद्रांवरील ईव्हीएम लोकशाही भवन येथील स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आले आहे. या ठिकाणी 4 जूनपर्यंत कडेकोट बंदोबस्त राहणार आहे. स्थानिक पोलिसांसोबतच एसआरपी एफचे 70 जवान आणि केंद्रीय सुरक्षा बलाचे 30 सुरक्षा जवान स्ट्रॉंग रूम परिसरात तैनात आहेत.

महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत प्रमुख लढत-अमरावती लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा विरुद्ध महाविकास आघाडीचे बळवंत वानखेडे यांच्यात प्रमुख लढत आहे. अमरावतीत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रचारासाठी सभा घेतली होती. नवनीत राणा या विद्यमान खासदार आहेत. त्यांना पुन्हा लोकसभा निवडणुकीत विजय मिळणार की मतदार महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून देणार, हे 4 जूनच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा -

  1. 'या' मतदारसंघात रात्री बारापर्यंत चाललं मतदान; काय आहे नेमकं कारण? - Lok Sabha Election 2024
  2. विरोधक जिंकतात त्यावेळी ईव्हीएम मशीन बरोबर, मग हरतात तेव्हा आक्षेप का? मुख्यमंत्र्यांचा प्रश्न तर राऊतांचा फडणवीसांवर भ्रष्टाचाराचा आरोप - CM Eknath Shinde
  3. ईव्हीएमवरच होणार मतदान, सर्वोच्च न्यायालयानं बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या फेटाळल्या सर्व याचिका - SC on EVM VVPAT

ABOUT THE AUTHOR

...view details