महाराष्ट्र

maharashtra

"स्वतःच्या मंत्रिमंडळाचा अर्थ कळला नाही तो..."; विनायक राऊतांची नारायण राणेंवर बोचरी टीका - Lok Sabha Election 2024

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 27, 2024, 6:18 PM IST

Lok Sabha Election 2024 : रत्नागिरी-सिंधुदूर्ग मतदारसंघामध्ये भाजपानं नारायण राणे (Narayan Rane) यांना उमेदवारी दिल्यानं ही लोकसभा निवडणूक चुरशीची झाली. खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) कणकवली येथे प्रचार सभेसाठी आले असता, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नारायण राणे यांच्यावर टीका केली.

Vinayak Raut
खासदार विनायक राऊत

प्रतिक्रिया देताना खासदार विनायक राऊत

सिंधुदुर्ग Lok Sabha Election 2024 : "मोदींना मत म्हणजे महागाईला मत, मोदींना मत म्हणजे बेरोजगारीला मत, मोदींना मत म्हणजे हुकूमशाहीला मत, मोदींना मत म्हणजे देशाची फाळणी करायला निघालेल्या दुसऱ्या हुकमी राजवटीला मत" हे आता लोकांना कळून चुकलं आहे, असं म्हणत खासदार विनायक राऊत यांनी भाजपावर जोरदार टीका केली. तसंच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी रत्नागिरी येथे बोलताना इंडिया आघाडीवर केलेल्या टीकेला राऊत यांनी उत्तर दिलं.

नारायण राणे यांच्यावर टीका : नारायण राणे यांना कोकणचं कॅलिफोर्निया करायचा आहे असं विधान केलं होतं. यावर बोलताना विनायक राऊत म्हणाले की, "99 सालापासून नारायण राणे हे कोकणचा कॅलिफोर्निया करेन असं बोलत आहेत. या उलट कोकणाला भकास करण्याचं काम नारायण राणे यांनी केलंय. तर कॅलिफोर्निया करायचं सोडाच प्रकल्पाच्या नावानं जिल्ह्यातील भूमी हडप करण्याचं काम जे नारायण राणे यांनी केलं आहे, ती भूमी जरी मोकळी करून दिली तरी भरपूर काही केल्यासारखं होईल, तर ज्या माणसाला स्वतःच्या मंत्रिमंडळाचा अर्थ कळला नाही तो कॅलिफोर्निया काय करणार."

देवेंद्र फडणवीस यांना विसर पडला : खासदार राऊत म्हणाले की, "अमित शाह यांनी पडणाऱ्या उमेदवारासाठी प्रचाराला न जाणं योग्य, अशी भूमिका घेतली. उद्धव ठाकरेंच्या काळात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळालेली थेट कर्जमाफी, नैसर्गिक आपत्तीत उद्धव ठाकरे यांनी केलेली आर्थिक मदत याबाबत देवेंद्र फडणवीस यांना विसर पडला आहे."

देवेंद्र फडणवीस का बोलले नाहीत : "उद्धव ठाकरे यांच्या काळात महाराष्ट्रात पाच वैद्यकीय शासकीय महाविद्यालय मंजूर करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कॅथ लॅब सोलापूरला हलवली तर कोकण भूमी हडप करण्याचा जो प्रयत्न केला जातोय, यावर देवेंद्र फडणवीस का बोलले नाहीत?" असा प्रश्न खासदार विनायक राऊत यांनी विचारला.

हेही वाचा -

  1. विनायक राऊतांचं डिपॉझिट जप्त करणार; नारायण राणे यांचा हल्लाबोल - Lok Sabha Election 2024
  2. "...तर मी राजकीय संन्यास घेईन, विनायक राऊतांनी काळजी करू नये", रामदास कदम असं का म्हणाले? पाहा व्हिडिओ - Lok Sabha Election 2024
  3. नारायण राणे यांना सलग तिसऱ्यांदा पराभूत व्हावं लागेल : विनायक राऊत - Lok Sabha Election 2024

ABOUT THE AUTHOR

...view details