"...तर मी राजकीय संन्यास घेईन, विनायक राऊतांनी काळजी करू नये", रामदास कदम असं का म्हणाले? पाहा व्हिडिओ - Lok Sabha Election 2024

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 5, 2024, 9:05 PM IST

thumbnail

रत्नागिरी Ramdas Kadam On Vinayak Raut : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुलाला उमेदवारी नाही मिळाली तर मी राजकीय संन्यास घेईन, विनायक राऊत यांनी याची काळजी करू नये असं शिवसेना नेते (शिंदे गट) रामदास कदम यांनी म्हटलंय. ते खेडमध्ये बोलत होते. ते म्हणाले की, "विनायक राऊत यांनी आपल्या पायखाली काय जळतंय ते आधी पाहावं, मला विनायक राऊत यांच्या बद्दल आदर आहे. कालच मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बसलो होतो, तिकीट वाटपात कोणतीही अडचण नाही. खोटं बोल पण रेटून बोल असं करू नका, तुम्ही जबाबदार नेते आहात. उद्धव ठाकरे यांनीच पक्ष बुडवला, विनायक राऊत तुम्ही तुमची काळजी घ्या. भविष्यात उद्धव ठाकरेंसोबत काहीही राहणार नाही, एक दिवस असा येईल उद्धव ठाकरे आणि त्यांची फॅमिली बॅग घेऊन रातोरात घर सोडून जातील. आपला देश सोडून निघून जातील, हे लिहून ठेवा", असं रामदास कदम यावेळी म्हणाले. तसंच रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेबाबत लवकरच निर्णय होईल असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.