महाराष्ट्र

maharashtra

'उत्तरन' मालिका फेम श्रीजिता डेच्या रिसेप्शन पार्टीचे फोटो व्हायरल, पाहा सुंदर पोस्ट - Sreejita de

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 27, 2024, 4:09 PM IST

Sreejita De : टीव्ही अभिनेत्री श्रीजिता डे तिच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीमुळे चर्चेत आली आहे. तिनं सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

Sreejita De
श्रीजिता डे

मुंबई - Sreejita De :'उत्तरन' फेम अभिनेत्री श्रीजिता डे ही आता चर्चेत आली आहे. या मालिकेमुळे ती प्रत्येक घराघरात लोकप्रिय झाली बनलीय. ती बराच काळ छोट्या पडद्यापासून दूर राहिली होती. अलिकडे ती कुठल्याचं टीव्ही मालिकेत दिसली नाही. पण ती सोशल मीडियावर आपल्या स्टाईलनं खळबळ माजवत राहते. 'बिग बॉस'च्या माध्यामातून तिनं पुन्हा एकदा तिच्या अभिनयच्या करिअरला सुरुवात केली. या शोमध्ये तिनं तिच्या बॉयफ्रेंडची झलक दाखवली होती. 'बिग बॉस' शोमधून बाहेर पडताचं तिनं तिच्या लग्नाची घोषणा केली आणि लगेचच लग्न केलं. श्रीजिता डेच्या लग्नाची चर्चा बरीच सोशल मीडियावर झाली होती.

श्रीजिता डेनं रिसेप्शन पार्टीचं फोटो शेअर केले : श्रीजितानं परदेशी बॉयफ्रेंड मायकल ब्लोहमबरोबर लग्न केलं असून तिनं लग्नाच्या 8 महिन्यांनंतर 26 मार्चला रिसेप्शन पार्टी दिली आहे. आता या कार्यक्रमामधील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. समोर आलेल्या फोटोंमध्ये श्रीजिता लाल रंगाच्या लेहेंग्यात दिसत आहे. तर मायकल काळ्या सूटमध्ये आहे. श्रीजिता वधूच्या लूकमध्ये खूप सुंदर दिसत आहे. तिनं तिच्या या लूकवर खूप कमीत कमी दागिने घातले आहेत. तिनं शेअर केलेले फोटो अनेकांना खूप आवडत आहेत. या फोटोवर चाहते या जोडप्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत.

श्रीजिता डेची प्रेमकहाणी : श्रीजितानं हे फोटो शेअर करत या पोस्टवर लिहिलं, ''हृदयांची भेट, प्रेमाचा उत्सव आणि आयुष्यभराच्या आठवणी.' श्रीजिता डेची प्रेमकहाणी तेव्हा चर्चेत आली, जेव्हा मायकलनं तिला आयफेल टॉवरसमोर लग्नासाठी प्रपोज केलं होतं. त्यांच्या लिपलॉक क्षणाचा फोटो चांगलाच व्हायरल झाला होता. यानंतर मायकलही 'बिग बॉस'मध्ये पाहुणा म्हणून आला होता, जिथे श्रीजिता आणि त्याची केमिस्ट्री पाहायला मिळाली. हे जोडपं सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. अनेकदा श्रीजिता आपल्या पतीबरोबरचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. श्रीजिताची इन्स्टाग्रामवर खूप मोठी फॅन फॉलोविंग आहे. तिला 1 मिलियन लोक इन्स्टाग्राम प्लेटफार्मवर फॉलो करतात.

हेही वाचा :

  1. 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो'मध्ये रणबीर कपूरनं केला मोठा खुलासा; नीतू कपूर झाली धक्क - Ranbir Kapoor
  2. मुनावर फारुकीविरोधात मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, अवैध पदार्थ सेवन करताना घेतलं ताब्यात - Munawar faruqui
  3. 'मगधीरा', 'रंगस्थलम' आणि 'आरआरआर' : राम चरणच्या उत्तुंग कारकिर्दीचा चढता आलेख - Ram Charan Birthday

ABOUT THE AUTHOR

...view details