ETV Bharat / entertainment

'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो'मध्ये रणबीर कपूरनं केला मोठा खुलासा; नीतू कपूर झाली धक्क - Ranbir Kapoor

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 27, 2024, 1:53 PM IST

Ranbir Kapoor : 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो'च्या पहिल्या एपिसोडमध्ये रणबीर कपूर त्याची आई नीतू कपूर आणि बहिण रिद्धिमा कपूर साहनी दिसणार आहेत. आता या शोचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Ranbir Kapoor
रणबीर कपूर

मुंबई - Ranbir Kapoor : कॉमेडियन कपिल शर्मा आणि त्याची टीम पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी परतत आहे. आता यावेळी त्याची टीम टीव्हीवर नव्हे तर नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो' 30 मार्चपासून सुरू होत आहे. या शोच्या अनेक व्हिडिओंपैकी पहिल्या भागाचा प्रोमो समोर आला आहे. पहिल्या एपिसोडमध्ये रणबीर कपूर त्याची आई नीतू कपूर आणि बहिण रिद्धिमा कपूर साहनी पाहुणे म्हणून येणार आहे. या भागामध्ये रणबीरच्या आयुष्याशी संबंधित अनेक खुलासेही होणार आहेत. व्हायरल होत असलेल्या प्रोमोमध्ये रणबीर कपूरच्या आयुष्याच्या संबंधित अनेक गुपित उघडणार आहेत. काही खुलासे तर रणबीरनं स्वत: केले आहेत.

रणबीर कपूरनं केला खुलासा : 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो'च्या प्रोमोमध्ये कपिल शर्मा म्हणतो की, ''रणबीरनं रिद्धिमाचे कपडे त्याच्या गर्लफ्रेंडला गिफ्ट केले आहेत.'' यावर रणबीर पटकन म्हणतो, ''मी माझ्या गर्लफ्रेंडला आईचे दागिनेही दिले आहेत.'' रणबीरचे उत्तर ऐकून नीतूला थोडा धक्का बसतो आणि मग हसायला लागतो. यावर प्रतिक्रिया देताना रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा म्हणते की, ''आमच्या पिढीनं सर्वात जास्त मजा केली आहे.'' याशिवाय शोमध्ये रणबीर कपूर त्याची लाडकी मुलगी राहा कपूरबद्दलही बोलला आहे. त्यानं म्हटलं की, ''राहाला 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो'मध्ये आणण्यास उत्सुक आहे.'' याशिवाय शोमध्ये नीतू कपूरनं सांगितलं की, ''राहा खूप गोंडस आहे आणि ती सर्वांकडे खूप प्रेमानं पाहते.''

या शोमध्ये हे कलाकार दिसेल : 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो'मध्ये पुन्हा एकदा कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हरची जोडी लोकांना पाहायला मिळणार आहे. दोघेही स्टार्स बऱ्याच दिवसांनी एकत्र आले आहेत. यावरून आता दोघांमधील वाद मिटले असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. प्रेक्षकांना पुन्हा एकदा सुनील ग्रोवरला गुत्थीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. शोमध्ये किकू शारदा आणि कृष्णा अभिषेक देखील लोकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. दरम्यान, रणबीरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो शेवटी 'अ‍ॅनिमल' चित्रपटामध्ये दिसला होता. त्याचा हा चित्रपट रुपेरी पडद्यावर जबरदस्त हिट ठरला होता. आता पुढं तो 'रामायण', 'लव्ह अँन्ड वॉर' , 'ब्रह्मास्त्र पार्ट 2' आणि 'ब्रह्मास्त्र पार्ट 3'मध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. 'मगधीरा', 'रंगस्थलम' आणि 'आरआरआर' : राम चरणच्या उत्तुंग कारकिर्दीचा चढता आलेख - Ram Charan Birthday
  2. मुनावर फारुकीविरोधात मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, अवैध पदार्थ सेवन करताना घेतलं ताब्यात - Munawar faruqui
  3. "तू कधी 'दिशा' बदलू नकोस" टायगर श्रॉफला अक्षय कुमारचा अनमोल सल्ला - Akshay Kumar advice to Tiger Shroff
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.