महाराष्ट्र

maharashtra

IND vs NZ Semifinal : भारतच जिंकणार! क्रिकेटप्रेमींना विश्वास; भारत-न्यूझीलंड उपांत्य फेरीची उत्सुकता शिगेला, पाहा व्हिडिओ

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 15, 2023, 1:05 PM IST

IND vs NZ Semifinal

मुंबई IND vs NZ Semifinal - विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होत आहे. हा सामना जरी दुपारी सुरु होणार असला तरी सकाळपासूनच प्रेक्षकांची उत्सुकता आणि जोश पाहायला मिळत आहे. भारत न्यूझीलंड सामन्याची उत्सुकता सर्वांना लागली असताना वानखेडे स्टेडियम बाहेर क्रिकेटप्रेमींचा जोश आणि उत्साह ओसंडून वाहत आहे.  भारतानं पहिल्यांदा फलंदाजी करून मोठी धावसंख्या रचावी.  यात रोहित, विराट आणि शुभमन हे चांगली फलंदाजी करतील, असं क्रिकेटप्रेमींनी म्हटलं आहे. तसंच हा सामना भारत जिंकणारच आहे, असं देखील क्रिकेटप्रेमी म्हणत आहेत. भारत न्यूझीलंड हा सामना पाहण्यासाठी जगभरातील प्रेक्षक दोन दिवसापासून मुंबई दाखल झाले आहेत. त्यामुळं मुंबईतील हॉटेलमधील भावही वाढले आहेत. तिकीट बुकिंग काही तासांतच फुल झालंय. इंग्लंडमधून आलेल्या प्रेक्षकांनी सांगितलं की, आज भारत जिंकेल. भारत अंतिम फेरीत दाखल होईल. भारत जिंकणार का हा प्रश्नच उपस्थित होत नाही, कारण भारताला जिंकावंच लागेल असं सुद्धा क्रिकेटप्रेमींनी म्हटलंय. 

ABOUT THE AUTHOR

...view details