महाराष्ट्र

maharashtra

Ganesh Visarjan 2023: 'मी माझ्या बाप्पाला निरोप द्यायला आलोय; गणपती काय, ईद काय आम्ही एकत्र असतो' - मुस्लिम भक्त

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 28, 2023, 8:55 PM IST

मुस्लिम भक्त

मुंबई: दहा दिवसांच्या गणपती बाप्पाला मुंबईकर भक्तिमय आणि आनंदाच्या वातावरणात निरोप देत आहेत. जवळपास संपूर्ण मुंबई शहर गिरगाव चौपाटीवर (Girgaon Chowpatty Ganesha Immersion) आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी जमलं आहे. (Ganesha Festival 2023) बाप्पाची शेवटची एक झलक आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी पारंपरिक पोशाखात जमलेले भक्त गुळलात रंगले आहेत. या गर्दीत एका व्यक्तीने लक्ष वेधून घेतलं. ते म्हणजे महम्मद रशीद (Mohammad Rasheed).
सुतारवाडीचा सार्वजनिक गणपती विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल झाला. (Ganesh Immersion in Mumbai) या मंडळाचे कार्यकर्ते जय श्री राम, गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत होते. यात लक्ष वेधून घेणारी बाब ही होती ती म्हणजे, महम्मद रशीद घोषणा देत होते आणि इतर त्यांच्या मागून मोरया... जय... असा जयघोष करत होते. आम्ही महम्मद रशीदला त्यांची प्रतिक्रिया विचारली असता महम्मदने सांगितलं की, "हा माझ्या घराच्या मंडळाचा गणपती आहे. मी लहानाचा मोठा याच सुतारवाडीत झालो. बाप्पाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत मी माझ्या बाप्पा सोबत असतो. या मंडळातील कार्यकर्ते ही सर्व माझी भावंडं आहेत. गणपतीचे 10 दिवस मी याच भावंडांसोबत बाप्पाच्या सेवेत असतो."

ABOUT THE AUTHOR

...view details