महाराष्ट्र

maharashtra

Types Of Salt : मीठाचे असतात 'इतके' प्रकार; जाणून घ्या कोणता प्रकार तुमच्यासाठी अधिक फायदेशीर

By

Published : Aug 11, 2023, 9:52 AM IST

किचनमध्ये असलेले मीठ हा पदार्थ जेवणाची चव वाढवतो. पण त्याचा जास्त वापर केल्याने जेवणाची चवही बिघडते. मीठाचे अनेक प्रकार आहेत. ज्याची चव व रंग वेगवेगळे असतात. चला तर मग जाणून घेऊया मीठाचे प्रकार आणि त्याचे फायदे.

Types Of Salt
मीठाचे प्रकार

हैदराबाद :मीठ आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी एक आवश्यक पोषक तत्व म्हणून काम करते. बेकिंग, स्वयंपाक आणि मसाला यासारखे खाद्यपदार्थ मीठाशिवाय अपूर्ण मानले जातात. मीठ शरीरातील अनेक प्रकारच्या समस्या दूर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. मीठाचे रंग, पोत, वापर आणि चवीनुसार प्रकार आहेत. मीठाच्या काही खास प्रकारांबद्दल जाणून घेऊय.

  • टेबल मीठ :टेबल सॉल्ट हे असे मीठ आहे, जे तुम्हाला सर्व घरांमध्ये सहज मिळेल. याला परिष्कृत मीठ देखील म्हणतात. कारण टेबल मीठ प्रक्रियेद्वारे तयार केले जाते. म्हणूनच त्याला नैसर्गिक मीठ म्हटले जात नाही. या मीठात आयोडीनचे प्रमाण पुरेसे असते. जे शरीरातील आयोडीनची कमतरता दूर करते. हे दाणेदार आणि बारीक मीठ जास्त प्रमाणात सेवन करणे आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही.
  • समुद्री मीठ :समुद्री मीठाच्या चवीबद्दल बोलायचे तर ते टेबल मीठापेक्षा हे खूप वेगळे आहे. हे मीठ बाष्पीभवनाने (समुद्राचे पाणी वाफेत बदलणारी प्रक्रिया) बनते. यात कमी सोडियम आणि आयोडीनचे प्रमाण जास्त असल्याने हे मीठ आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. बद्धकोष्ठता, तणाव, गॅस इत्यादी समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी देखील समुद्री मीठ वापरले जाते.
  • सैंधव मीठ :हिमालयीन गुलाबी मीठ आपण 'रॉक सॉल्ट' किंवा सैंधव मीठ या नावानेही ओळखतो. या मिठाची खास गोष्ट म्हणजे यात टेबल सॉल्टपेक्षा कमी सोडियम असते. जे आपल्या आरोग्याला अनेक आरोग्यदायी फायदे देतात. याव्यतिरिक्त त्यात लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियमसह अनेक खनिजे देखील असतात. हे मीठ दिसायला थोडे घट्ट असते आणि तुम्हाला त्याची चव वेगळी लागेल.
  • काळे मीठ :काळे मीठ नावापुरतेच काळे असते, प्रत्यक्षात त्याचा रंग हलका गुलाबी असतो. हे मीठ आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. जर तुम्हाला बद्धकोष्ठता, गॅस किंवा पोटदुखीची समस्या असेल तर याचा वापर करणे फायदेशीर ठरू शकते. हे मीठ बहुतेक उन्हाळ्यात जास्त वापरले जाते.
  • कोशेर मीठ :कोशेर मीठ बहुतेक मोठ्या रेस्टॉरंटमध्ये शेफ वापरतात. त्याच्या आकार टेबल मीठापेक्षा थोडा मोठा आहे. त्यात सामान्य मीठासारखे आयोडीन नसते. हे सामान्य मिठापेक्षा खूप हलके आणि स्वच्छ आहे, परंतु ते चवीनुसार कमी खारट आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details