मुघलांमध्ये जरब बसविणाऱ्या महाराणा प्रताप यांची आज पुण्यतिथी,  शौर्यानं गाजविला इतिहास

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 19, 2024, 9:44 AM IST

Updated : Jan 19, 2024, 9:58 AM IST

Death Anniversary of Maharana Pratap

Death Anniversary of Maharana Pratap 2024: महाराणा प्रताप सिंह हे भारतातील महान योद्ध्यांपैकी एक होते. त्यांचा जन्म 9 मे 1540 रोजी कुंभलगड (राजस्थान) येथे वडील महाराणा उदय सिंह आणि आई राणी जीवन कुंवर यांच्या कुटुंबात झाला. उदयसिंग यांच्या २५ मुलांपैकी महाराणा प्रताप सिंह हे ज्येष्ठ पुत्र होते. महाराणा उदय प्रताप सिंह यांच्या मृत्यूनंतर त्यांना मेवाडचा 54वा राजा म्हणून त्यांचा उत्तराधिकारी बनवण्यात आले.

हैदराबाद : भारतातील महान योद्धा महाराणा प्रताप हे 7 फूट 4 इंच उंचीचे व्यक्तिमत्व होते. ते मेवाडच्या सिंहासनावर विराजमान झाल्यानंतर नुसत्या नावानं दिल्लीचे राज्य हादरत असे. एवढा महान आणि पराक्रमी योद्धा राणा प्रताप सिंह यांचा मृत्यू कसा झाला? महाराणा प्रताप यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे जीवनकार्य जाणून घेऊ.

अकबरानं राणा प्रतापवर हल्ला का थांबवला? अकबरालाही मेवाडवर मुघल ध्वज फडकवायचा होता. पण मेवाडच्या महाराणा प्रतापनं शेवटच्या श्वासापर्यंत अकबराची इच्छा पूर्ण होऊ दिली नाही. त्यासाठी त्याला सतत युद्धक्षेत्रात राहावं लागलं. त्यांनी केवळ मेवाड अकबराच्या सैन्यापासून सुरक्षित ठेवले नाही तर मेवाडच्या आसपासच्या इतर राजपूत संस्थानांनाही अकबराकडून हिसकावून मुक्त केले. मेवाडच्या महाराणानं आपल्या आयुष्यात कधीही गुलामगिरी स्वीकारली नाही. अकबराच्या सैन्याला वारंवार पराभूत केले. महाराणा प्रतापांनी चित्तोड वगळता सर्व किल्ले शत्रूंपासून मुक्त करून घेतले. अखेर महाराणा प्रतापांच्या भीतीला घाबरून अकबर आणि त्यांच्या सैन्यानं मेवाडवर हल्ला करणे थांबवले.

हल्दीघाटीची लढाई : राणा प्रताप यांच्याकडून होणाऱ्या मोठ्या आणि छोट्या लढायांमध्ये सततच्या पराभवाला कंटाळून 1576 मध्ये अकबरानं दोन लाख सैनिकांसह मेवाडवर हल्ला केला. 20 हजार राजपूत सैनिक आपल्या दोन लाख सैनिकांसमोर फार काळ टिकू शकणार नाहीत, असा त्यांचा विश्वास होता. पण तीन तासांहून अधिक काळ चाललेल्या या हल्दीघाटीच्या लढाईतही अकबर हा राणा प्रताप सिंग यांना अटक करू शकला नाही. याचे मुख्य कारण म्हणजे मुघल सैन्य त्यांच्यावर हल्ला करण्याआधीच राणा प्रताप यांच्या घोडा चेतकने त्यांना मुघलांपासून वाचवत विस्तीर्ण कालव्याच्या पलीकडे उडी मारली. तिथे शत्रू पोहोचू शकत नव्हते. या प्रयत्नात चेतकला वीरमरण आले. राणा प्रताप यांना वाचवण्यात घोडा यशस्वी झाला. अकबराचा पुन्हा एकदा लढाईत पराभव झाला.

या पराभवाने राणा प्रताप सिंह निराश झाले नाहीत : दिवारच्या लढाईनंतर, महाराणा प्रताप सिंह यांनी उदयपूरसह अकबराच्या ताब्यातील सुमारे 23 क्षेत्रे पुन्हा ताब्यात घेतली होती. दिवारच्या लढाईनंतर, अकबर जवळजवळ निराश झाला होता. महाराणा प्रताप यांच्यावरील सैन्यदलाकडून होणारी कारवाई थांबवण्यात आली होती. पण महाराणा प्रताप सिंग निश्चिंत नव्हते. त्यांना माहीत होते की अकबर सहजासहजी फार काळ शांत राहणार नाही. अकबर हा आपली लष्करी शक्ती मजबूत करत राहिला.

महाराणा प्रताप यांच्या निधनाची बातमी अकबर रडला : 1596 मध्ये राणा प्रताप आपल्या सर्व मुलांसह शिकारीसाठी जंगलात गेले होते. तेव्हा एका सिंहाने राणा प्रतापवर हल्ला केला. यावर महाराणाने आपला बाण सिंहावर सोडला. तेव्हा झालेल्या सिंहाच्या हल्ल्यात महाराणा प्रताप गंभीर जखमी झाले. 19 जानेवारी 1597 रोजी थोर शूर योद्धा राणा प्रताप सिंह यांनी चावंड येथे अखेरचा श्वास घेतला. चावंडपासून दोन किमी अंतरावर असलेल्या वढोली नावाच्या गावात महाराणा प्रताप यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. महाराणा प्रताप यांच्या निधनाची बातमी ऐकून अचानक अकबराचा विश्वास बसला नाही. पण हे सत्य असल्याचे कळताच अकबरालादेखील रडू कोसळले.

हेही वाचा :

  1. लाल बहादुर शास्त्री स्मृतीदिन : जाणून घ्या लाल बहादुर शास्त्री यांना कसं मिळालं 'शास्त्री' हे नाव
  2. अर्थवाढीची चालक आहे 'भारतीय स्टार्टअप इकोसिस्टीम'
  3. नुकतेच केस 'कलर' केले असतील तर अशी घ्या काळजी
Last Updated :Jan 19, 2024, 9:58 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.