महाराष्ट्र

maharashtra

Link Pan To Aadhaar : आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करायला आयकर विभागाने दिली मुदत वाढ, जाणून घ्या नवीन तारीख

By

Published : Mar 29, 2023, 11:06 AM IST

आयकर विभागाने आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करायला मुदत वाढवून दिली आहे. आता ३० जूनपर्यंत करदात्यांना आपले पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करता येईल.

Link Pan To Aadhaar
संर्गहित छायाचित्र

हैदराबाद :आयकर विभागाने आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करण्यासाठी ३१ मार्च ही मुदत दिली होती. त्यामुळे ३१ मार्चला पॅन कार्ड आधारला लिंक न केल्यास करदात्यांना दंड करण्यात येणार असल्याचेही आयकर विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले होते. मात्र आता आयकर विभागाने आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करण्याची तारीख वाढवून दिली आहे. याबाबतची घोषणा आयकर विभागाने केली असून आता तीन महिने मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता आयकर विभागाकडून आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख ३० जून ही करण्यात आली आहे.

आधार कार्डला पॅन लिंक न केल्यास होईल नुकसान :आयकर विभागाने आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करण्यासाठी ३१ मार्च ही तारीख दिली होती. त्यानंतर १ एप्रिलपासून आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक न केल्यास पॅन कार्ड रद्द करण्याची घोषणाही आयकर विभागाच्या वतीने करण्यात आली होती. त्यासह जर आधार कार्डला पॅन कार्ड लिंक केले नसल्यास आयकर विभागाने १ एप्रिलपासून अशा करदात्यांना दंड ठोठावण्याची घोषणाही केली होती. आयकर विभागाने आधार कार्डला पॅन कार्ड लिंक न करणाऱ्या करदात्यांना ५०० रुपयांचा दंड ठोठावण्याचे जाहीर केले होते. आता मात्र ३० जूनपर्यंत आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करण्याची तारीख वाढवून देण्यात आली आहे. त्यामुळे १ जुलैपासून दंड आकारण्यात येणार असल्याची माहितीही आयकर विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

करदात्यांना तीन महिन्याचा मिळाला वेळ : आयकर विभागाने अगोदर आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करण्यासाठी ३१ मार्च ही तारीखच वाढवून दिली होती. मात्र तरीही अनेक करदात्यांनी आधार कार्डला पॅन कार्ड लिंक केले नसल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे आयकर विभागाने आधार कार्डला पॅन कार्ड लिंक न करणाऱ्या कारदात्यांना दंड ठोठावण्याचेही स्पष्ट केले. मात्र तरीही काही करदात्यांनी आधार कार्डला पॅन कार्ड लिंक केले नसल्याने आयकर विभागाने पुन्हा तीन महिन्याचा कालावधी वाढवून दिला आहे. त्यामुळे करदात्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

आयकर विभागाने वाढवली दंडाची रक्कम :आयकर विभागाने वारंवार सूचना देऊनही करदात्यांनी आधार कार्डला पॅन कार्ड लिंक केले नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आयकर विभागाचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. आयकर विभागाने अगोदर आधार कार्डला पॅन कार्ड लिंक न केल्यास केवळ ५०० रुपये दंड ठोठावण्याचे जाहीर केले होते. आता मात्र आयकर विभागाने आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करण्याची तारीख तीन महिने वाढवून दिली आहे. त्यामुळे आयकर विभागाने दंडाची रक्कमही वाढवून दिली आहे. आता आधार कार्डला पॅन कार्ड लिंक न केल्यास करदात्यांना १००० रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे.

हेही वाचा - Income Tax On Online Gaming : 1 एप्रिलपासून ऑनलाईन गेमद्वारे मिळालेल्या उत्पन्नावरचा वाढणार कर

ABOUT THE AUTHOR

...view details