महाराष्ट्र

maharashtra

वाशिम : लग्न लावत नाही म्हणून मुलाने केली बापाची हत्या

By

Published : Nov 6, 2021, 3:58 PM IST

मुलगा प्रमोद भारती यांनेच वडिलांची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. आरोपीविरुद्ध 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींला अटक केली असून, पुढील तपास जऊळका पोलीस करीत आहेत.

children killed the father
children killed the father

वाशिम -जिल्ह्यातील जऊळका येथील धर्मा भारती याची कुऱ्हाडीने हत्या केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच जऊळका पोलीस घटनास्थळी पोहचून तपास केला असता पोटच्या मुलानेच हत्या केल्याचं उघड झाले आहे.

लग्न लावत नाही म्हणून मुलाने केली बापाची हत्या

मुलगा प्रमोद भारती यांनेच वडिलांची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. आरोपीविरुद्ध 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींला अटक केली असून, पुढील तपास जऊळका पोलीस करीत आहेत. 'मुलगा प्रमोद हा व्यसनी आहे. त्यांचे 27 वर्ष वयाचा होऊनही वडील लग्न लावून देत नसल्याने प्रमोद भारती यांनी वडिलांची कुऱ्हाडीने हत्या केल्याची माहिती जऊळका पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अजिनाथ मोरे यांनी दिली आहे.
हेही वाचा -खंडणी प्रकरणात सचिन वाझेला 13 नोव्हेंबरपर्यंत मुंबई गुन्हे शाखेची पोलीस कोठडी

ABOUT THE AUTHOR

...view details