महाराष्ट्र

maharashtra

Corona Kalatil Vivek Book : कोरोना काळातील पोलिसांच्या कामगिरीला सलाम; 'कोरोना काळातील विवेक' पुस्तकाचे प्रकाशन

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 31, 2023, 10:46 PM IST

Corona Kalatil Vivek Book : स्वजन फाउंडेशन आयोजित आणि सृजन संवाद प्रकाशित सदर पुस्तकाचे प्रकाशन सोहळा ठाण्यातील सहयोग मंदिर येथे पार पडला. यावेळी 'कोरोना काळातील विवेक' या पुस्तकांचे प्रकाशन मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर (Vivek Phansalkar) यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

Corona Kalatail Vivek Book Publish
कोरोना काळातील विवेक पुस्तक

कोरोना काळातील विवेक' पुस्तकाचे प्रकाशन

ठाणेCorona Kalatil Vivek Book : कोरोना काळ हा सर्वांसाठीच अतिशय कठीण असा काळ होता. या वैश्विक आपत्तीच्या काळात मानव जातीचे अतोनात नुकसान झाले. परंतु या प्रतिकुल काळातच ठाणे पोलीस आयुक्तला तर्फे करण्यात आलेल्या उत्तुंग कामगिरीचा भावनिक आढावा घेणारे 'कोरोना काळातील विवेक' या लेखिका साधना जोशी यांच्या पुस्तकाचे अनावरण झाले. कोरोनाच्या प्रतिकूल अशा काळात प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनने कोण कोणत्या पद्धतीचा अवलंब करत समाजामध्ये समन्वय साधत आदर्श राखला होता.

पुस्तक प्रकाशन सोहळा : सामान्य जनता ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांच्या मदतीचा हात देत खाकी वर्दीतील हे देवदूत अहोरात्र झटत होते. याकाळात काही पोलीस कर्मचारी कोरोना विरुद्धच्या या युद्धात शहीद देखील झाले. अनेक जणांनी मृत्यशी यशस्वी झुंज देत पुन्हा आपल्या कर्तव्यावर हजर झाले. पोलीस दलाच्या या सर्व कामगिरीचा आढावा घेत 'लेखिका साधना योगेश जोशी' यांनी शहीद झालेल्या पोलीस योद्धा्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. सदर पुस्तकाचे प्रकाशन बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर (Vivek Phansalkar) यांनी केलं. ठाण्यातील सहयोग मंदिर येथे पार पडलेल्या या प्रकाशन सोहळ्याला ठाण्याचे सहपोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर, ठाण्याचे आमदार संजय केळकर, डॉक्टर महेश बेडेकर, सिव्हिल रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ कैलास पवार व ज्येष्ठ पत्रकार डॉ उदय निरगुडकर हे उपस्थित राहिले होते.



ठाण्यात वाचवले अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्राण: कोरोना काळात जेव्हा सर्वसामान्य नागरिक घरामध्ये बसून होते. त्या काळात नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी रस्त्यावरती तैनात होते. अशा वेळेस कोरोनाग्रस्त झालेल्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सर्वतोपरी मदत मिळावी. त्यांच्यावर ती चांगले उपचार व्हावेत आणि त्यांचे प्राण वाचवण्यासाठी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर हे स्वतः जातीने लक्ष देत होते. त्यांच्या कुटुंबीयांशी बोलून त्यांना योग्य ते उपचार मिळत आहेत की, नाही याच्यावर लक्ष ठेवून होते. अनेकांना जीवनदान देण्याचे काम पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी केलं आहे.



विवेक फणसाळकर यांच्यावर विश्वास : विवेक फंचाळकर यांच्यासोबत काम केलेल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आजही विवेक फणसाळकर हे आपल्या कुटुंबीयांमधलेच एक आहेत, असा विश्वास देऊन एक अधिकारी म्हणून त्यांनी दिलेल प्रेम कायम स्मरणात राहील, असं मत कोरोनाग्रस्त झालेल्या अधिकाऱ्यांनी बोलून दाखवलं आहे. विवेक फणसळकर यांनी ठाण्यामध्ये पोलीस आयुक्त म्हणून केलेलं काम हे कायम ठाणेकरांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे.



हेही वाचा -

  1. Chandrakant Patil : धुरंधर नेत्याला फडणवीस पुरून उरतील, चंद्रकांत पाटलांची अप्रत्यक्ष पवारांवर टीका
  2. Manufacturers increased the Dynasty slavery: कारखानदारांनी घराणेशाही, गुलामी वाढविली. साखर गुलामी पुस्तकाचे प्रकाशन
  3. Sanjay Raut criticizes Narendra Modi : 'नेमकचि बोलणें' पंतप्रधानांना भेट देऊ; संजय राऊतांची पंतप्रधानांवर टीका

ABOUT THE AUTHOR

...view details