महाराष्ट्र

maharashtra

Burglary in Patan taluka: पाटण तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ, १५ बंद घरे फोडून १४ तोळ्यांचे दागिने लंपास

By

Published : Aug 5, 2022, 12:13 PM IST

पाटण तालुक्यात चोरट्यांनाी एकाच रात्रीत चाफळ परिसरातील ( Burglary in Chafal Area ) १५ बंद घरे फोडून ८ लाख रुपये किंमतीचे साडे चौदा तोळे सोने लंपास केले आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ( Fear of thieves in Patan taluka ) निर्माण झाले आहे.

Thieves spree in Patan taluka
पाटण तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ

सातारा:पाटण तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला ( flurry of thieves in Patan taluka ) आहे. एकाच रात्रीत चाफळ परिसरातील ( Burglary in Chafal Area ) १५ बंद घरे फोडून ८ लाख रुपये किंमतीचे साडे चौदा तोळे सोने लंपास केले आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ( Fear of thieves in Patan taluka ) निर्माण झाले आहे.


बंद घरे हेरून हातसफाई -चाफळ परिसरातील जाळगेवाडी, खालची-वरची, गमेवाडी, माथणेवाड़ी आणि माजगावमधील १५ बंद घरे फोडून साडे चौदा तोळे सोने चोरट्यांनी लंपास केले. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी हातसफाई करत मोठा ऐवज लंपास केला. या घटनेने पाटण तालुक्यात खळबळ उडाली आहे.


एकाच घरातील सात तोळे दागिन्यांची चोरी -जाळगेवाड़ी (ता. पाटण) येथील महादेव भिकू चव्हाण हे नातेवाईकांकडे गेले होते. सकाळी परत आल्यानंतर त्यांना घराच्या दरवाजाचे कुलुप तोडल्याचे दिसले. घरात जाऊन पाहिले असता घरातील सात तोळ्याचे दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी १५ बंद घरे फोडून ८ लाख रुपये किमतीचे १४.५ ताळे सोने लंपास केल्याची नोंद चाफळ पोलीस दूरक्षेत्रात झाली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर हे या घटनेचा तपास करत आहेत.

हेही वाचा -Rana Couple Non Bailable Arrest Warrant : राणा दाम्पत्य न्यायालयीन प्रक्रियेबाबत गंभीर नाही; अजामीनपात्र अटक वॉरंट बजावण्याची पोलिसांची मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details