महाराष्ट्र

maharashtra

Uday Samant on Political Crisis : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

By

Published : May 11, 2023, 5:28 PM IST

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. आमदार अपात्रतेचा निर्णय हा विधानसभा अध्यक्षांकडे सोपावला आहे. तसेच राज्यपालांच्या कृतीवरही सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. या सर्व विषयावर प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. तर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अभ्यास करावा लागेल असे उदय सामंत म्हणाले.

Uday Samant Reaction
उद्योग मंत्री उदय सामंत

निकालावर माहिती देताना मंत्री उदय सामंत

रत्नागिरी :राज्यातील सत्ता संघर्षाचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयात पार पडला. कालपर्यंत सरकार पडणार असे जे बोलत होते, त्यांचे मनसुभे धुळीला मिळाले आहेत. परंतु संपूर्ण निकालाचा अभ्यास केल्यानंतरच यावर बोलणे उचित ठरेल अशी प्रतिक्रिया उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर दिली आहे. ते रत्नागिरीत बोलत होते. याबाबत बोलताना उदय सामंत म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण काय दिली आहेत, याचा अभ्यास करावा लागेल, कारण सर्वोच्च न्यायालयाने नोंदविलेली ते निरीक्षण आहे, पण आम्हाला अंतिम निर्णय महत्वाचा आहे असे, उदय सामंत म्हणाले.



पुराव्यानिशी बोलावे: चंद्रकांत खैरे हे माजी खासदार आहेत. चंद्रकांत खैरे हे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कसे काम करत नाहीत हे सांगायला, एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन बंगल्यावर यायचे, असा गौप्यस्फोट उदय सामंत यांनी केला. तसेच मी जर ठाकरे यांच्या संपर्कात असेन, तर याचे पुरावे द्यावेत, पुराव्यानिशी बोलावे, नाहीतर मी चंद्रकांत खैरे हे नंदनवन बंगल्यावर यायचे याचे पुरावे देतो असे, आव्हान उदय सामंत यांनी खैरे यांना दिले आहे.

कालपर्यंत सरकार पडणार असे जे बोलत होते, त्यांचे मनसुभे धुळीला मिळाले आहेत. परंतु संपूर्ण निकालाचा अभ्यास केल्यानंतरच यावर बोलणे उचित ठरेल -उद्योग मंत्री उदय सामंत


शिंदे, फडणवीस पत्रकार परिषदे: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. आमदार अपात्रतेचा निर्णय हा विधानसभा अध्यक्षांकडे सोपावला आहे. तसेच राज्यपालांच्या कृतीवरही सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. या सर्व विषयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालयाच्या निर्णयावर आम्ही समाधानी आहोत. महाविकास आघाडीला ही चपराक आहे, अशी तिखट प्रतिक्रिया शिंदे, फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.



हेही वाचा -

  1. Ujjwal Nikam Reaction सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निकालाने सरकारच्या स्थिरतेवर कोणताही परिणाम झालेला नाही उज्ज्वल निकम
  2. Cabinet expansion सुप्रीम निरीक्षणानंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा बच्चू कडू संजय शिरसाटांसह इतरांच्या आशा पल्लवीत
  3. SC on Uddhav Thackeray Resigns उद्धव ठाकरेंचा राजीमाना शिंदेफडणवीसांचा विनर पाईंट

ABOUT THE AUTHOR

...view details