महाराष्ट्र

maharashtra

President Ram Nath Kovind Raigad Visit : रायगड किल्ला यात्रा माझ्यासाठी तीर्थक्षेत्र - राष्ट्रपती रामनाथ कोविंद

By

Published : Dec 6, 2021, 9:26 PM IST

किल्ले रायगडाला भेट देणे ( Visit to Fort Raigad ) हे प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. आज किल्ले रायगडाची केलेली यात्रा मी तीर्थक्षेत्र मानतो. किल्ले रायगडावर येऊन मला खूप आनंद झाला आहे. छत्रपती संभाजी राजे ( Chhatrapati Sambhaji Raje ) यांनी मला निमंत्रित केल्याबाबत आभार मानतो, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद ( President Ram nath Kovind ) यांनी आपल्या अभि भाषणात म्हणाले.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद
राष्ट्रपती रामनाथ कोविंद

रायगड -विसाव्या शतकात गांधीजींनी स्थापन केलेले हिंद स्वराज्य हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ( Chhatrapati Shivaji Maharaj ) हिंदवी स्वराज्यापासून प्रेरित होते. किल्ले रायगडाला भेट देणे ( Visit to Fort Raigad ) हे प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. आज किल्ले रायगडाची केलेली यात्रा मी तीर्थक्षेत्र मानतो. किल्ले रायगडावर येऊन मला खूप आनंद झाला आहे. छत्रपती संभाजी राजे ( Chhatrapati Sambhaji Raje ) यांनी मला निमंत्रित केल्याबाबत आभार मानतो, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद ( President Ram nath Kovind ) यांनी आपल्या अभि भाषणात म्हणाले.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद रायगडावर
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे स्वागत
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या इतर मान्यवर



राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज (सोमवारी) रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहिली. याच प्रसिद्ध किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. राष्ट्रपतींसोबत त्यांच्या पत्नी सविता कोविंद, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, खासदार संभाजी राजे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी आयोजित प्रदर्शनाला राष्ट्रपतींनी भेट देऊन दोन पुस्तकांचे प्रकाशनही केले. राष्ट्रपती रामनाथ गोविंद यांनी गडावर आधारित माहिती पटाचे प्रकाशनही केले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गडावर आल्यानंतर प्रथम होळीच्या माळरान येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर राजसदरेवर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन केले. राजसदरेवर राष्ट्रपती कोविंद यांनी अभिभाषण केले. त्यानंतर समाधी स्थळावर आपल्या कुटूंबसह जाऊन नतमस्तक झाले. यावेळी रायगड प्राधिकरण विकास मार्फत सुरू असलेल्या कामाची पाहणीही राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केली. छत्रपती संभाजी राजे यांनी राष्ट्रपती यांना तलवार भेट दिली.

हेही वाचा -President Ram Nath Kovind at Raigad : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे किल्ले रायगडावर आगमन

ABOUT THE AUTHOR

...view details