महाराष्ट्र

maharashtra

'देवदूत' प्रशांत घरत यांचा गृहमंत्री अनिल देशमुखांच्या हस्ते सत्कार

By

Published : Mar 16, 2020, 7:49 PM IST

मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक प्रशांत घरत याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सत्कार केले आहे. मंत्री देशमुख यांनी नाईक यांना मंत्रालयात बोलावून शाल, पुष्पगुच्छ दिले व त्यांचा सत्कार केला. यावेळी झालेल्या घटनेबाबतची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रशांत घरत यांच्याकडून घेऊन त्याच्या कामगिरीबाबत कौतुक केले.

prashant gharat felicitated
पोलीस नाईक प्रशांत घरत यांचा सत्कार करताना गृहमंत्री अनिल देशमुख

रायगड- मांडवा बंदरात अजंठा बोट दुर्घटनेत ८० प्रवाशांचे देवदूत ठरलेले मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक प्रशांत घरत यांचा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सत्कार केला आहे. मंत्री देशमुख यांनी नाईक यांना मंत्रालयात बोलावून शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. मांडवा बंदरात घडलेल्या घटनेचा थरार ऐकून यावेळी मंत्री अनिल देशमुख यांनी प्रशांत घरत यांचे कौतुकही केले.

पोलीस नाईक प्रशांत घरत यांचा सत्कार करताना गृहमंत्री अनिल देशमुख

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही प्रशांत घरत, खलाशी आणि जिल्हा पोलिसांचे अभिनंदन केले होते. गेटवे येथून ८५ प्रवासी व ५ कर्मचाऱ्यांसहित एक बोट मांडवा बंदराकडे येत होती, मात्र ती वाटेतच बुडाली. यावेळी मांडवा बंदरावर तैनात असलेले मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक प्रशांत घरत आणि सदगुरू कृपा बोटीतील २ खलाशांनी बुडणाऱ्या बोटीतील ८० जणांचे प्राण वाचविले, तर इतर प्रवाशांना स्पीड बोटीच्या सहायाने वाचविण्यात आले होते. प्रशांत घरत याच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी घेतली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रशांत घरत यांचा सत्कार केला. यावेळी मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे उपपोलीस निरीक्षक धर्मराज सोनके उपस्थित होते.

हेही वाचा-रायगड जिल्हा परिषदेचा 111 कोटींचा अर्थसंकल्प, गेल्या वर्षीच्या तुलनेत 9 कोटींची घट

ABOUT THE AUTHOR

...view details