महाराष्ट्र

maharashtra

रायगडात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचा 1 मे मुहूर्त टळला; लस नसल्याने लसीकरण बंद

By

Published : May 1, 2021, 10:28 AM IST

Updated : May 1, 2021, 10:36 AM IST

जिल्ह्यात 89 केंद्रांवर लसीकरण सुरू करण्यात आले होते. मात्र लसीचा साठा कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने सद्यस्थितीत सर्वच लसीकरण केंद्र बंद करण्यात आलेली आहेत. लस उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण सुरू केले जाईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात येत आहे.

no vaccination in Raigad
लस

रायगड - जिल्ह्यात कोरोना लसीचा साठा संपला असल्याने लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आली आहेत. 1 मे पासून 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार होती. मात्र जिल्ह्यात लसीचा साठाच उपलब्ध नसल्याने आजचा 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचा लसीकरण मुहूर्त टळला आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण सुरू केले जाईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

जिल्ह्यात अडीच लाख नागरिकांनी घेतली आहे लस -

16 जानेवारीपासून जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. त्यानंतर आजपर्यंत अडीच लाखांहून अधिक नागरिकांनी कोव्हीशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीचे डोस घेतले आहेत. जिल्ह्यात 89 केंद्रांवर लसीकरण सुरू करण्यात आले होते. मात्र लसीचा साठा कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने सद्यस्थितीत सर्वच लसीकरण केंद्र बंद करण्यात आलेली आहेत.

रायगड जिल्ह्यात लस नसल्याने लसीकरण बंद..

जिल्ह्यात लसीचा साठा संपला -

जिल्ह्यात पंचवीस लाखाहून अधिक लोकसंख्या आहे. आतापर्यंत 1 लाख 46 हजार 023 पुरुष, 1 लाख 8 हजार 632 महिला, 20 इतर असे एकूण अडीच लाख नागरिकांनी लस घेतली आहे. 80 टक्के नागरिक अजून लसीपासून वंचित आहेत.

18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांचा आजचा मुहूर्त टळला-

1 मे पासून 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले आहे. मात्र रायगड जिल्ह्यात लसीचा साठाच उपलब्ध झाला नसल्याने या नागरिकांचा लसीकरण मुहूर्त टळला आहे. जिल्ह्यात लस उपलब्ध नसल्याने सर्व लसीकरण केंद्र आज बंद ठेवण्यात आलेली आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरू केले जाईल, असे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी म्हटले आहे.

Last Updated :May 1, 2021, 10:36 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details