महाराष्ट्र

maharashtra

Deepak Kesarkar criticizes Uddhav Thackeray: 'तेव्हा' सेनेत वडापाव खाऊन प्रचार करणारे कार्यकर्ता होते - मंत्री दीपक केसरकर

By

Published : Feb 2, 2023, 4:52 PM IST

शिवसेनेत वडापाव खाऊन प्रचार करणारे कार्यकर्ते होते, असे म्हणत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवरती टीका केली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख यांनी कार्यकर्त्यांना त्यांची माहिती लीक होऊ नये यासाठी आयफोन वापरा असा आदेश दिला आहे. त्यावर आता दीपक केसरकर यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे.

Deepak Kesarkar criticizes Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे आणि दीपक केसरकर

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर माध्यमांशी बोलताना

पुणे : कसब्यातही युती अभेद्यच राहणार. ही जागा भाजपाच लढेल आम्ही त्यांना पाठिंबा देणार असून शिंदे गट आणि भाजपची युती असल्याची प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिलेली आहे. कसबा पोटनिवडणुकीसाठी आज (गुरुवारी) विरोधी पक्ष नेते अजित पवारसुद्धा बैठक घेत आहेत. विविध पक्षांमध्ये इच्छुकांची गर्दी आहे. परंतु यामध्ये कुठेही शिंदे गट इच्छुकांच्या यादीत नाहीत. आम्ही भाजपला पाठिंबा देऊन ती जागा भाजपसह लढू, असे दीपक केसकर यांनी आज पुण्यात सांगितले आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल, असेसुद्धा केसरकर यावेळी म्हणाले आहेत.

बोगस शाळांवर होणार कारवाई :पुण्यातील बोगस इंग्रजी शाळेविषयी बोलताना बोगस एनओसी शाळेबाबत कारवाई सुरू आहे. कोणी दोषी आढळले तर नक्कीच कारवाई होईल. पण, शाळा बंद होणार नाहीत. मुलांचे नुकसान आम्ही होऊ देणार नाही. काही ठिकाणी गुन्हेही दाखल झाले आहेत. दलालांवरही कारवाई होणार आहे. आता सर्व प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे. बोगस एनओसीचा प्रकार थांबवण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील, असे सुद्धा मंत्री केसरकर म्हणाले.

सत्यजीत तांबेंच्या विजयाची ग्वाही :नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे बंडखोर सत्यजीत तांबे अपक्ष असले तरी 100 टक्के निवडून येतील, अशी अपेक्षासुद्धा मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केली आहे. शिंदे गटात येण्यासाठी प्रचंड गर्दी असल्याचेही दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून अटक करण्याची शक्यता आहे. आव्हाडांचे आरोप खोटे आहेत. आता त्यांना अटकेची भीती वाटते. त्यांनी काही चुकीचे केले नसेल तर मग कशाला घाबरतात, अशी ही प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिलेली आहे. पुण्यामध्ये एका कार्यक्रमासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना वरील प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

शिवसेनेच्या हिंदुत्वावर टीका :युतीच्या विचारांपासून आणि दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी लढा दिलेल्या हिंदुत्वापासून जे दूर गेलेत त्यांना मदतीची गरज असल्याचा उपरोधिक टोला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी 22 जानेवारी, 2023 रोजी ठाकरे गटाला लगावला होता. आम्ही बाळासाहेबांच्या विचारानेच मार्गक्रमण करणार. हा आमचा ठाम निश्चय आहे, असेही केसरकर कराडमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले होते.

बाळासाहेबांची इच्छा मोदींनी पूर्ण केली : दीपक केसरकर म्हणाले की, युतीच्या विचारांबरोबर, हिंदुत्वाच्या विचारधारेबरोबर राहावे, अशी आम्ही मागणी केली होती. परंतु, त्यांनी विचारधारा सोडली आहे. एकच दिवस मला पंतप्रधान करा. मी ३७० कलम रद्द करतो, असे म्हणणाऱ्या बाळासाहेबांनंतर मोदींनी तो निर्णय घेत कलम रद्द केले. त्याच काश्मीरमध्ये जाऊन कॉंग्रेसच्या पुढाऱ्यांना कोणी मिठी मारत असेल तर त्याच्यासारखा बाळासाहेबांचा अपमान असूच शकत नाही, अशी टीकाही त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर केली होती.

हेही वाचा :Firing On TDP Leader: भरदिवसा टीडीपीच्या नेत्यावर गोळीबार.. गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details