महाराष्ट्र

maharashtra

पालघरातील शेतकऱ्यांना विमा मिळण्यास दिरंगाई; शेतकरी संतापले

By

Published : Dec 1, 2019, 10:01 PM IST

संकटकाळी पीकविमा फायद्याचा ठरत नसल्याची ओरड शेतकरीवर्गाकडून केली जात आहे. पीकविमा मिळविण्यासाठी विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना विविध अटी व नियमांचा अडथळा निर्माण केल्या जातो. त्यामुळे विमा मिळण्यास दिरंगाई होत असल्याचे शेतकरीवर्गाकडून सांगितले जात आहे.

palghar
शेत

पालघर- भात पिकांना संरक्षित करण्यासाठी शेतकरी वर्ग पीकविमा उतरवित असतो. हा पीकविमा शेतकरी वर्ग स्वेच्छेने काढत असतो. मात्र, काढलेला पीकविमा संकटकाळी फायद्याचा ठरत नसल्याची ओरड शेतकरी वर्गाकडून केली जात आहे. पीकविमा मिळविण्यासाठी विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना विविध अटी व नियमांचा अडथळा निर्माण केल्या जातो. त्यामुळे विमा मिळण्यास दिरंगाई होत असल्याचे शेतकरी वर्गाकडून सांगितले जात आहे.

प्रतिक्रिया देताना पालघर जिल्ह्यातील शेतकरी

नैसर्गिक आपत्तीत शेतकरी वर्गाचा खरीप आणि रब्बी हंगामात पिकांचा विमा उतरविला जातो. यात खरीप हंगामातील भात पिकांचा विमा सेवा सहकारी संस्था बँकेच्या माध्यमातून खाजगी पिकविमा कंपन्यांकडून उतरविला जातो. सक्तीचा पीकविमा नसल्याने काही शेतकरीवर्गाकडून पीकविमा उतरविला जात नाही. मात्र, जे शेतकरी दरवर्षी पीकविमा उतरविताता त्यांना नैसर्गिक आपत्तीच्या काळात विमा कंपन्यांकडून विमा मिळत नाही. विमा देण्यात कंपन्यांकडून दिरंगाई केली जाते, अशी तक्रार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.

वाडा तालुक्यात ७ नोव्हेंबरपर्यंत बाधित शेतकऱ्यांमध्ये पीकविमा उतरविलेले आणि अर्ज प्राप्त झालेल्या शेतकरीवर्गाची संख्या ३ हजार ८१५ होती. यात पंचनामे झालेले ३४५० शेतकरी असून पंचनामा झालेले क्षेत्र २३८० हेक्टर होते. पुढे पंचनामे वाढतील तसे क्षेत्र आणि शेतकरी संख्या वाढेल, अशी कृषी कार्यालयाकडून माहिती देण्यात आली होती. फळपिके असोत किंवा भात पिके, त्यांच्या सुरक्षिततेसाठी विमा हा नैसर्गिक आपत्तीत शेतकरी वर्गाला दिलासादायक ठरत असतो. मात्र, संकट काळी विमा कंपन्यांकडून पीकविमा न मिळने किंवा विमा देण्यास दिरंगाई होत असल्याने शेतकऱ्यांच्या संकटात भर पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून पीकविमा लवकरात लवकर देण्याची मागणी केली जात आहे.

हेही वाचा-पालघरच्या दहा गावांतील पाण्याचे स्त्रोत दुषित, नागरिकांचे जीव धोक्यात

ABOUT THE AUTHOR

...view details