महाराष्ट्र

maharashtra

रेशीम उद्योगाला उझी माशीचा डंख, शेतकरी संकटात

By

Published : Oct 31, 2020, 7:59 PM IST

जिल्ह्यात वारंवार होणारी अतिवृष्टी, दुष्काळ आणि नापिकी यातूनही मार्ग काढत शेतकरी शेतामध्ये नवनवीन प्रयोग करतात. बरेच शेतकरी आता पूरक व्यावसाय म्हणून रेशीम उद्योगाकडे ओळले आहेत. मात्र आता उझी माशीच्या प्रादुर्भावामुळे रेशीम उद्योग संकटात सापडला आहे.

Silk farming in crisis at usmanabad
उझी माशीच्या प्रादुर्भावामुळे रेशीम उद्योग संकटात

उस्मानाबाद-जिल्ह्यात वारंवार होणारी अतिवृष्टी, दुष्काळ आणि नापिकी यातूनही मार्ग काढत शेतकरी शेतामध्ये नवनवीन प्रयोग करतात. बरेच शेतकरी आता पूरक व्यावसाय म्हणून रेशीम उद्योगाकडे ओळले आहेत. मात्र आता उझी माशीच्या प्रादुर्भावामुळे रेशीम उद्योग संकटात सापडला आहे.

रेशीम उद्योगाला उझी माशीचा डंख

कळंब तालुक्यातील कोथळा या गावातील रेशीम उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या आहेत. उझी माशीच्या प्रादुर्भावामुळे रेशीम शेतीचे प्लॉट उद्धवस्त होण्याच्या मार्गावर असून, ही माशी रेशीम आळीला दंश करून मारते, त्याच बरोबर रेशीम प्लॉट मधील एकाही आळीला या माशीने दंश केला, तर संपूर्ण प्लॉट मधील आळ्या या मरत असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. या उझी माशी पासून बचावासाठी शेतकरी प्रयत्न करत असून, उध्वस्त झालेले रेशीम शेतीचे प्लॉट हे शेतकरी जाळून टाकू लागले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधी लॉकडाउन आणि त्यानंतर अतिवृष्टी व आता आणखी एक संकट उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर ओढवले आहे.यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. एक प्लॉट नष्ट झाला तर शेतकऱ्याचे जवळपास एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान होतं. त्यामुळे अडचणीत आलेल्या या रेशीम उद्योगाकडे शासनाने लक्ष देवून मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details